Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 ची विक्री सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । दक्षिण कोरिया येथील स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 या स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच Samsung च्या अधिकारीक वेबसाईटवर जाऊन हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold5 या दोन्ही स्मार्टफोनची किंमत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण या दोंन्ही मोबाईलच्या किमती आणि त्यामध्ये देण्यात आलेले फीचर्स याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

Galaxy Z Flip 5 किंमत

Galaxy Z Flip 5 हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज, 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून याप्रमाणे याच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत. यातील 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 99,999 एवढी असून 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज या वेरियंट ची किंमत 1,09,999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन मिंट, क्रीम, ग्रे फाईट, लव्हेंडर कलर मध्ये उपलब्ध आहेत. Galaxy Z Flip 5 वर Amazon वरून खरेदी केल्यावर 7,000 चे कूपन डिस्काउंट मिळत आहे. तसेच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डसह या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 8,000 रुपयांची झटपट सूट मिळेल.

Galaxy Z Fold 5 किंमत

Galaxy Z Fold 5 हा स्मार्टफोन देखील 3 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. यातील 12GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,50,999 एवढी आहे. तर 12GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या वेरियंट ची किंमत 1,64,999 रुपये एवढी आहे. यासोबतच 12 GB रॅम 1TB स्टोरेज वेरियंटची किंमत 1,84,999 रुपये एवढी आहे. Galaxy Z Fold 5 Amazon वरून खरेदी केल्यावर अनुक्रमे Rs 9,000 कूपन डिस्काउंट मिळत आहे. तसेच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डसह या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 8,000 रुपयांची झटपट सूट मिळेल.

Galaxy Z Flip 5 चे फीचर्स –

Galaxy Z Flip 5 या वेरियंट मध्ये 6.7 इंच चा फुल एचडी डायनामिक अमोलेड 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 1080× 2640 पिक्सल मध्ये उपलब्ध आहे. या वेरियंट मध्ये एक्स्टर्नल डिस्प्ले 3.4 इंच सुपर AMOLED हा देण्यात आलेला असून हा मोबाईल स्नॅप ड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर चालतो. हे. Galaxy Z Flip 5 हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर ONE UI 5.1.1 यावर काम करतो. Samsung Galaxy Z Flip 5 मध्ये 12 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा ,12 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Galaxy Z Fold 5 चे फीचर्स

Galaxy Z Fold 5 या वेरियंट मध्ये 7.6 इंचचा फुल एचडी + QXGA + डायनामिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये सेकंडरी डिस्प्ले हा 6.2 इंचाचा आहे. या मोबाईल मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ONE UI 5.1.1 वर काम करतो. Galaxy Z Fold 5 मध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड,10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेराही देण्यात आला आहे.