Samsung ने लाँच केले 2 टॅबलेट्स; जाणून घ्या किंमत

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Samsung च्या वस्तू आपण अगदी विश्वासाने खरेदी करत असतो. Samsung चे मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटला ग्राहकांची मोठी पसंती आपल्याला पाहायला मिळते. हाच विश्वास जपण्यासाठी कंपणी सातत्याने नवनवीन प्रोडक्त्त बाजारात आणत असते. आताही Samsung आपल्या ग्राहकांसाठी २ टॅबलेट्स लाँच केले आहेत. Galaxy Tab S9 FE आणि Galaxy S9 FE+ असे या दोन्ही टॅबलेटची नावे आहेत. या दोन्ही टॅबलेट मध्ये कंपनीने दमदार बॅटरी लाइफ प्रदान केली आहे. जाणून घेऊया या नवीन टॅबलेटचे फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन

Galaxy Tab S9 FE या टॅबलेट मध्ये 10.9 इंच चा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेटसह येतो. या टॅबलेट मध्ये Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आले आहे. Galaxy S9 FE+ या टॅबलेट मध्ये सॅमसंग ने 12.4 इंच चा LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. आणि Exynos 1380 प्रोसेसर वर काम करतो. कंपनीने या दोन्ही टॅबलेट मध्ये ग्राफिक्स साठी mali G68 MP5 GPU उपलब्ध केले आहे.

कॅमेरा

GALAXY TAB S9 FE या टॅबलेट मध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने या टॅबलेट मध्ये सेल्फी साठी 12 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड फ्रंट कॅमेरा उपलब्ध केला आहे. GALAXY TAB S9 FE plus या टॅबलेट मध्ये 8 MP +8 MP अल्ट्राव्हाइड कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. आणि सेल्फी साठी 12 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड फ्रंट कॅमेरा कंपनीने यामध्ये उपलब्ध केला आहे.

बॅटरी

GALAXY TAB S9 FE या टॅबलेट मध्ये 8000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy S9 FE+ या टॅबलेट मध्ये 10090mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी 45 W चार्जिंगला सपोर्ट करते. यातील GALAXY TAB S9 FE टॅबलेट मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध केले आहे. Galaxy S9 FE+ या टॅबलेट मध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज उपलब्ध आहे.

किंमत

सॅमसंग कंपनीने Galaxy S9 FE+ आणि Galaxy S9 FE+ हे दोन टॅबलेट लॉन्च केले आहे. GALAXY TAB S9 FE या टॅबलेट ची किंमत 449.99 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 37,450 रुपये आहे. कंपनीने हा टॅबलेट मिंट सिल्वर, ग्रे आणि लव्हेंडर कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. तर दुसरीकडे GALAXY S9 FE PLUS या टॅबलेटची किंमत 54 हजार 999 एवढी आहे. कंपनीने हा टॅबलेट मिंट, सिल्वर, लवेंडर कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे.