टाइम्स मराठी (Samudrayaan Mission)। भारताने नुकतच चांद्रयान 3 हे मिशन लॉन्च केल्यानंतर आता आपलं पुढचं लक्ष मिशन समुद्रयान असल्याची माहिती उघड होत आहे. भारत फक्त अंतरिक्षाची उंची गाठणार नसून समुद्राच्या खोलवर जाऊन पृथ्वीवरील बरेच रहस्य उघडणार आहे. देशाचे विज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेमध्ये याबद्दल माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशन समुद्रयान अंतर्गत पाणबुडी एका सबमर्सिबल वाहनात तीन मानवांना 6000 मीटर खोलीपर्यंत घेऊन जाईल. समुद्रयान मोहीम ही भारताची पहिली मानवयुक्त मोहीम असेल. या मिशनच्या माध्यमातून समुद्राच्या खोलवर असलेल्या संसाधने आणि जैवविविधतेचा शोध घेणे हा उद्देश असणार आहे. महत्वाचे म्हणजे या मिशनचा इकोसिस्टीमवर कोणताही दुष्परिणाम पडणार नाही.
कधी सुरु होणार मिशन समुद्रयान? (Samudrayaan Mission)
मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार, 2026 पर्यंत या समुद्रमिशनची (Samudrayaan Mission) सुरू होणार असल्याची शक्यता आहे. समुद्राच्या खोलीवर जाणाऱ्या सबमसिरबल वाहनाचे नाव मत्स्य 6000 असणार आहे. या वाहनाची चाचणी 2024 मध्ये करण्यात येणार आहे. मत्स्य 6000 हे वेगवेगळ्या फेजमध्ये तयार करण्यात येत आहे. पहिल्यांदा 500 मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली मानव युक्त पाणबुडी बनवण्याचे काम करण्यात आले आहे. याची चाचणी बंगालच्या उपसागरामध्ये करण्यात आली. हे मिशन चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी यांनी डिझाईन केले आहे. त्याचबरोबर या इन्स्टिट्यूटने बऱ्याच प्रकारचे अंडरवॉटर इन्स्ट्रुमेंट तयार केले आहे. या इन्स्ट्रुमेंट मध्ये ऑटोनॉमस कोरिंग सिस्टीम, ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल, डीप सी मायनिंग सिस्टीम हे सर्व इन्स्ट्रुमेंट डिझाईन केले आहे.
यापूर्वी 8 जून 2023 ला माणसाशिवाय 7000 मीटर खोल मिशन समुद्र पूर्ण करण्यात आलं होते. परंतु आता प्रथमच मिशन समुद्रयान मध्ये ३ माणसांचा समावेश असेल. हे भारताचे पहिले मानवयुक्त समुद्रयान मिशन असणार असून यासाठी केंद्राच्या ब्लू इकॉनोमिक पॉलिसीचा सपोर्ट मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.