SanDisk ने मेमरी स्टोअर करून ठेवण्यासाठी लॉन्च केले काही प्रोडक्ट

टाइम्स मराठी । वेस्टर्न डिजिटल कंपनीचा सबब्रँड SanDisk ने नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. यासोबतच कंपनीने ग्राहकांच्या स्टोरेज संदर्भात काही गरजा पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. आपल्या मोबाईल मधील डेटा  किंवा आपण एखाद्या ठिकाणी कॅप्चर केलेले फोटोज मेमरी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला जास्त स्टोरेज स्पेस किंवा स्टोअर करून ठेवण्यासाठी काही प्रॉडक्ट लागतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही नवीन प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही मेमरी स्टोअर करून ठेवू शकता

   

SanDisk Ultra Dual Drive Go

तुम्ही मेमरी स्टोअर करून ठेवण्यासाठी एखादा पेन ड्राईव्ह पाहत असाल तर आम्ही तुम्हाला अशा पेन ड्राइव बद्दल सांगणार आहोत, जे की तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकतात. आणि या पेन ड्राइव्ह मध्ये तुम्हाला जास्त स्टोरेज देखील मिळू शकते. हा पेन ड्राईव्ह तुमचे काम सोपे करेल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत  SanDisk Ultra Dual Drive Go या मल्टी कनेक्टर फ्लॅश ड्राईव्ह बद्दल. हा पेन ड्राईव्ह ऐबसिंथे ग्रीन, लव्हेंडर, नवागीयो बे कलर या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1 TB पर्यंत स्टोरेज मिळते. म्हणजेच तुम्ही या पेन ड्राईव्ह मध्ये 1 TB पर्यंत डेटा सेव्ह करून ठेवू शकतात. या पेन ड्राईव्हची किंमत 128 GB बेस मॉडेल सह 1,109 रुपये आहे.

1.5TB SANDISK ULTRA MICRO SD CARD

SANDISK कंपनीचे ULTRA MICRO SD CARD हे ऑप्शन तुम्हाला  अँड्रॉइड डिव्हाइसेस, क्रोमबुक, विंडो लॅपटॉप यासारख्या डिव्हाइसेस साठी  अप्रतिम आहे. या डिव्हाइसेस साठी हे मायक्रो एसडी कार्ड तुमच्यासाठी बेस्ट चॉईस असेल. हे जगातील सर्वात जास्त स्पीड असलेले 1.5 TB मेमरी कार्ड आहे. या मेमरी कार्ड सोबत 150 mbps पर्यंत रीड स्पीड मिळेल. या मेमरी कार्डची किंमत 14,999 रुपये आहे. हे मेमरी कार्ड 10 जानेवारी 2024 पासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय या मेमरी कार्डवर 10 वर्षांपर्यंत वॉरंटी देखील देण्यात येत आहे.

 SanDisk Pro Cinema CFexpress Type B Card

जर तुम्हाला चित्रपट, कॉलिटी व्हिडिओज आणि कंटेंट सेव करायचे असेल तर CFexpress Type B Card हे तुमच्यासाठी खास प्रीमियम ऑप्शन आहे. या कार्डसोबत प्रोफेशनल्स ला 1400 mbps न्यूनतम सस्टेन्ड राईट स्पीड सह 8k व्हिडिओ कॅप्चर करण्याचा ऑप्शन मिळतो. CFexpress Type B Card उंचावरून पडल्यावर देखील तुटत नाही. यासोबतच  50 न्यूटन पर्यंत  दाब सहन करू शकतो. या कार्डची किंमत 320 GB व्हेरियंट साठी 44,999 रुपये आहे. याशिवाय हे कार्ड लाइफटाइम वॉरंटी ऑफर करते.