आता तुमचेही Light Bill येणार कमी; फक्त घरी आणा ‘हे’ Device

टाइम्स मराठी । वीज (Light) हि आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आज-काल विजेशिवाय कोणतेच काम होऊ शकत नाही. अंधारापासून बचाव करण्यासाठी लाईटची गरज असते. तर गर्मी होत असल्यास पंखा, कुलर आपण वापरतो. मोबाईल चार्ज करण्यासाठी, किचनच्या काही कामासाठी देखील वीज ही लागतेच. छोटया मोठया कामांसाठी देखील विजेचा वापर करावाच लागतो. अशातच विज बिल (Light Bill) देखील वाढत जाते. पावसाळ्यात आणि गर्मीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे बिल येते. जर तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू इच्छित असाल तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाईस उपलब्ध आहे. या उपकरणांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं विज बिल कमी करू शकतात. आणि या सोबतच काही विजेवर चालणारे काम देखील या माध्यमातून होऊ शकते. चला जाणून घेऊयात.

   

तुम्ही विजेचे बिल कमी करण्यासाठी सोलर पावरचा वापर करू शकतात. सोलर पावर हे असे जनरेटर आहे, ज्याचा लाईट गेल्यावर देखील वापर होऊ शकतो. आणि दिवसा विजेचे बिल देखील कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे अत्यंत छोटे डिव्हाइस असून सोप्या पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. या डिवाइस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड उपलब्ध असून त्यापैकी SARRVAD हे पोर्टेबल सोलर पावर जनरेटर S -150 तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. तुम्ही हे छोटे सोलार डिवाइस कोठेही ठेवू शकता.

किंमत किती?

SARRVAD या पोर्टेबल सोलर पावर जनरेटर मध्ये 42000mAh 155 व्हाट्स बॅटरी देण्यात आलेली आहे. या जनरेटर च्या माध्यमातून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि लाईट देखील कनेक्ट करता येऊ शकतात. या जनरेटरची खासियत म्हणजे तुम्ही आयफोन 8 वेळा चार्ज करू शकतात. या जनरेटरचं वजन 1.82 किलोग्रॅम एवढे असून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी देखील सोयीस्कर आहे. या पोर्टेबल सोलर पावर जनरेटर ची किंमत 19000 रुपये असून तुम्हाला हे जनरेटर कमी किंमतीत देखील उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनच्या सेल मधून ते खरेदी करावे लागेल.

सूर्याच्या प्रकाशाने होतय चार्ज –

पोर्टेबल सोलर पावर जनरेटरला चार्ज करण्यासाठी कोणत्याही लाईटची किंवा विजेची गरज नसून सूर्याच्या प्रकाशाने हे जनरेटर अचानक चार्ज होते. हे जनरेटर चार्ज करण्यासाठी तुम्हाला ते उन्हात म्हणजे छतावर किंवा घराच्या बाहेर ठेवावे लागेल. यामुळे ते पूर्णपणे चार्ज होईल. आणि तुम्ही दिवसभर त्याचा वापर करू शकतात. या जनरेटरच्या वापरामुळे तूमचा विजेचा वापर कमी होईल. आणि तुमचे वीज बिल प्रत्येक महिन्यापेक्षा कमी येईल.