टाइम्स मराठी । आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच तंत्रज्ञान एवढं पुढे चाललं आहे की, त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आता भारतात इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. कारण आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्विस सुरू होणार आहे. स्टारलिंक या कंपनीने सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता Jio आणि वन वेब यांच्या माध्यमातून सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आणि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा किंवा इंटरनेटसाठी टॉवर उपलब्ध नाही अशा ठिकाणी असलेल्या ग्राहकांना या सॅटेलाईट इंटरनेट सुविधेचा फायदा होईल.
काय असेल ही सुविधा
आजच्या या डिजिटल 5G युगामध्ये सॅटेलाईट इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला विना तार आणि टॉवर इंटरनेट मिळू शकेल. यासाठी DOT दूरसंचार विभागाने जिओ आणि वन वेब यांना लाईव्ह प्रदर्शनाची मंजुरी दिली आहे. त्यानुसार या महिन्यामध्ये जिओ आणि वनवेब या दोन्ही कंपन्या इंटरनेट सेवा कशा पद्धतीने काम करेल, याचा लाईव्ह डेमो देणार आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांना GMPCS लायसन्स देण्यात आले आहे. सध्या या इंटरनेट सर्विसची 90 दिवसांसाठी चाचणी सुरू असून गरज भासल्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी DOT यांच्याकडून वाढवण्यात येणार आहे.
भारताची अर्थव्यवस्था वाढेल
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून जिओ आणि वनवे या दोन्ही कंपन्यांना इंटरनेट सर्व्हिसच्या टेस्टिंगसाठी आणखीन काही दिवसांची मंजुरी मिळू शकते. यासोबतच सरकारकडून या कंपन्यांना टेस्ट स्पेक्टम देखील देऊ शकते. यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत असून ही सुविधा सुरू झाल्यास भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 6% CAGR इथपासून ते 13 बिलियनपर्यंत वाढू शकते.
अमेझॉन देखील देणार सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा
भारतामध्ये सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी बऱ्याच कंपन्या त्यांचे लक आजमावत आहे. यासोबतच बऱ्याच कंपन्यांकडून या सॅटेलाईट सुविधेसाठी प्रयत्न सुरू आहे. अशातच अमेझॉन ही जेफ बेजोस यांची कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सुविधा प्रदान करण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे. ॲमेझॉन कंपनीने यासंदर्भात फाईल DOT कडे पाठवली आहे. DOT कडून मंजुरी मिळाल्यानंतर अमेझॉन प्रोजेक्ट कुईपर यांच्या माध्यमातून भारतामध्ये सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा उपलब्ध करू शकते.