टाइम्स मराठी । मोबाईल हा आजकाल गरजेचा झाला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन बँकिंग, मनी ट्रान्सफर करणे यासारखे कामे होतात. यासोबतच लाखो युजर्स सोशल मीडियावर सक्रिय राहत असून सायबर क्राईम देखील प्रचंड वाढले आहे. बऱ्याचदा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा कॉलिंग च्या माध्यमातून स्कॅम झाल्याचे बरेच प्रकार समजले असतील. हे स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकताच आणखीन एक स्कॅम उघड झाला आहे. हा स्कॅम कॉलिंग च्या माध्यमातून करण्यात आला नसून आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करून फ्रॉड करण्यात आला आहे. या प्रॉब्लेम च्या माध्यमातून एका महिलेकडून 1.4 लाख रुपये उकळल्याचे समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण
कॅनडा येथील 59 वर्षाची महिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून करण्यात आलेल्या फ्रॉडचा शिकार बनली आहे. फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने AI जनरेटर व्हॉइस च्या मदतीने फ्रॉड केला आहे. AI जनरेट व्हॉइस च्या माध्यमातून महिलेच्या भाच्याचा आवाज काढून पैशांची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी या स्कॅमरने एक्सीडेंट झाल्याची माहिती देत पैसे पाठवण्याची मागणी केली. या महिलेने एमर्जेंसी लक्षात घेता बँक अकाउंट मधून 1.4 लाख रुपये ट्रान्सफर केले.
आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून फसवणूक वाढली
आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच गुगल आणि बऱ्याच एप्लीकेशन, कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजंटचा चुकीच्या पद्धतीने वापर होताना दिसून आला. आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करत आता स्कॅमर मोठ्या संख्येने फ्रॉड करत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे गरजेचे असून या फ्रॉडींग पासून वाचण्यासाठी काही टिप्स फॉलो करायला हव्यात. जाणून घ्या कोणत्या आहेत या टिप्स.
या टिप्सचा वापर करून स्कॅम होण्यापासून वाचू शकतात
1) तुम्हाला आलेला कॉल आणि कॉल वर बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज हा ओळखीचा आहे की नाही याची माहिती मिळत नाही तोपर्यंत पर्सनल माहिती देऊ नये.
2) एखादा व्यक्ती तुमच्या सोबत कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक म्हणून बोलत असेल आणि पैशांची मागणी करत असेल तर घाबरून पैसे पाठवू नका. तुम्ही त्या व्यक्तीच्या नंबर वर कॉल करून किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना कॉल करून संपूर्ण माहिती घ्या.
3) लगेच पैसे सेंड करा असं सांगणाऱ्या व्यक्तीवर चुकूनही विश्वास ठेवू नका.
4) जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या नावाने फोन येत असेल, आणि तुम्हाला या कॉल बद्दल काही शंका असेल तर कॉल बंद करा आणि कंपनीसोबत संपर्क साधा.
5) सध्या सुरू असलेल्या व्हॉइस स्कॅम टेक्नॉलॉजी बद्दल पूर्णपणे माहिती घेऊन तुम्ही या स्कॅम मध्ये अडकण्यापासून वाचू शकतात. जर तुम्हाला AI व्हॉइस स्कॅम साधी टारगेट केले जात आहे असं वाटत असेल तर सायबर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही रिपोर्ट दाखल करू शकता.