शास्त्रज्ञांना सापडला लोखंडाने भरलेला ग्रह; आकाराने पृथ्वीपेक्षा थोडा लहान

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो कडून लावला जातो. नुकतंच चंद्रावर उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, हायड्रोजन, पाणी आणि जीवसृष्टी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान 3 हे मिशन लॉन्च करण्यात आले. त्यानंतर सूर्याच्या अभ्यासासाठी देखील इस्रोने आदित्य L1 हे मिशन लॉन्च केले. आता शास्त्रज्ञांना लोखंडाने भरलेला ग्रह (Iron Planed) सापडला आहे. हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा थोडा कमी आहे.

   

ट्रांजीटिंग एक्सो प्लॅनेट सर्वे सॅटॅलाइट TESS च्या मदतीने हा ग्रह शोधला गेला आहे. एस्ट्रो फिजिकल जर्नल लेटर्स मध्ये पब्लिक स्टडी नुसार हा नवीन ग्रह पूर्णपणे सॉलिड लोखंडाने बनलेला असून हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे. या ग्रहाचे नाव ग्लिज 367 B असे आहे. हा ग्रह पूर्णपणे वेगळा असून पृथ्वीच्या आकाराचा असला तरीही पृथ्वीपेक्षा दुप्पट घनता असलेला ग्रह आहे. कारण या ग्रहामध्ये पूर्णपणे शुद्ध लोखंड भरलेले आहे.

नासाने पाठवलेल्या फोटो नुसार हा ग्रह आगीच्या गोळ्यासारखा दिसत आहे. परंतु असं नसून लाल रंगामुळे हा ग्रह अशा प्रकारे दिसतो. त्याचबरोबर शास्त्रज्ञानुसार हा एक अल्ट्रा शॉर्ट पिरियड ग्रह आहे. अल्ट्रा शॉर्ट पिरियड ग्रह म्हणजे असा ग्रह जो तारे किंवा सूर्याभोवती फक्त 7.7 तासात प्रदक्षिणा पूर्ण करतो. तुरीन युनिव्हर्सिटीच्या पीएचडी स्टूडेंट आणि सायंटिस्टने या ग्रहाबाबत सांगितले की, ग्लिज 367 बी चे आणखीन दोन ग्रह आहेत. हे ग्रह ट्रांजिस्टिंग एक्स प्लॅनेट सर्विस सॅटेलाईटने दोन वर्षांपूर्वी शोधले होते.

तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की या ग्रहावर एवढे लोह कस काय आले? तर रिसर्च पेपर मध्ये एका संशोधकाने याबाबत उत्तर दिले की, हा ग्लिज 367 बी ग्रह अशा ठिकाणी तयार झाला असेल, ज्या ठिकाणी लोह मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच हा ग्रह लोह समृद्ध क्षेत्रामध्ये निर्माण झाला. सोशल मीडियावर सध्या या नवीन ग्रहाचे फोटोज व्हायरल होत असून याबाबत आणखीन शोध घेणे सुरू आहे.