TIMES MARATHI | समुद्रामध्ये बरेच रहस्य दडलेले आहे. हे रहस्य शोधून काढण्यासाठी वैज्ञानिक वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्याचबरोबर समुद्रामध्ये घडणाऱ्या घटना, समुद्रामध्ये असलेल्या काही रहस्यमय गोष्टी या सर्वांचा शोध वैज्ञानिकांच्या माध्यमातून घेतला जातो. आता वैज्ञानिकांना अलास्का समुद्रामध्ये सोन्याचा गोळा सापडला आहे. हा गोळा सोनेरी रंगाचा आणि अंड्याच्या आकाराचा आहे. हा रहस्यमय गोळा पाहून वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत.
अमेरिकेतील अलास्का येथील ही घटना असून वैज्ञानिकांना अलास्का च्या समुद्रामध्ये 3300 मीटर खोलवर हा सोनेरी रंगाचा अंड्याच्या आकाराचा मोठा गोळा सापडला आहे. वैज्ञानिकांनी या गोळ्याचा लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ बनवला आहे. त्याचबरोबर हा गोळा काढत असताना वैज्ञानिकांना रोबोटची मदत घ्यावी लागली. यावेळी त्यांनी रोबोटच्या माध्यमातून हा गोळा जहाजामध्ये ठेवला.
वैज्ञानिकांनी सांगितले की, अलास्काच्या समुद्रामध्ये ज्या ठिकाणी हा रहस्यमय गोळा सापडला आहे त्या ठिकाणी सूर्याचे किरण पोहोचत नाही. हा रहस्यमय गोळा पांढऱ्याशुभ्र खडकामध्ये अडकलेला होता. त्याची रुंदी दहा सेंटिमीटर एवढी होती. या गोळ्यावर एक छिद्र असल्याचा देखील वैज्ञानिकांनी सांगितलं. त्याचबरोबर हे छिद्र जुने असून एखाद्या माशाने यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असेल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. वैज्ञानिकांच्या मते जर हे एखाद्या जीवाचे अंडे असेल तर, एक प्रश्न उद्भवतो. एवढा मोठा आकाराचे कोणत्या जीवाचे अंडे असेल. कारण हे अंडे छोट्या माशाचे असू शकत नाही. वैज्ञानिकांकडून अजून या गोळ्या बाबत माहिती मिळवणे सुरू आहे.