मंगळावर जीवन शक्य आहे का? शास्त्रज्ञांनी केला हैराण करणारा दावा

टाइम्स मराठी । मंगळ (Mars Planet) हा ग्रह सूर्यापासून चौथा आणि सूर्यमालेतील दुसरा सर्वात लहान ग्रह आहे. मंगळाला लाल ग्रह देखील म्हटले जाते. मंगळ हा पातळ वातावरण असलेला एक पार्थिव ग्रह असून त्याच्या पृष्ठभागावर क्रेटर दऱ्या, बर्फ यासारखे बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत. पृथ्वीच्या जवळ असल्याने आपल्याला नेहमीच मंगळाचे आकर्षण राहिले आहे. त्याचाच भाग म्हणजे नासाचे क्युरिओसिटी रोवर हे 2012 पासून मंगळावर आहे. या रोवरच्या माध्यमातून नासा या लाल ग्रहाचा शोध घेत आहे. यासोबतच आता नासाच्या शास्त्रज्ञांना अभूतपूर्व शोध लावून मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असू शकते असा अंदाज वर्तवला आहे.

   

नेचर या मॅगझिनच्या माध्यमातून या शक्यतेबद्दल लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. नासाच्या क्युरीओसिटी मार्स रोवरच्या रिपोर्ट ने मिळालेल्या काही फोटोज च्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी ग्रहावर जीवनसृष्टी असल्याची शक्यता वर्तवली आहे. या फोटोज मध्ये दाखवल्याप्रमाणे वेट ड्राय सायकल म्हणजेच मंगळाच्या पृष्ठभागावर ओला आणि सुका भाग दिसत आहे. त्यानुसार शास्त्रज्ञांच्या मते मंगळावर यापूर्वी जीवसृष्टी असू शकते. या क्युरीओसिटी मार्स रोवरच्या माध्यमातून हे फोटोज हेक्सागोनल पॅटर्न मध्ये दाखवण्यात आले आहे.

फ्रान्स येथील इन्स्टिट्यूट डि रेकर्च एन एस्ट्रोफिजिक एट प्लेनेटोलॉजी च्या विलियम रैपीन यांनी सांगितलं की, हे हेक्सागोनल पॅटर्न पूर्णपणे मातीच्या दलदली प्रमाणे दिसून येत आहे. वेट अँड ड्राय सायकल सतत बनत असेल तरच मातीचे दल दल बनतात. वातावरणाच्या बदलावामुळे देखील हे होऊ शकते. या मातीचा थर आणि सल्फेटचा थर यांच्यातील ट्रांजेक्शनमुळे देखील हे घडले असेल. वारंवार कोरडे आणि ओले झाल्यामुळे या मातीचे सांधे काहीसे मऊ झाले आणि Y आकारात बदलले. आणि पुढे जाऊन षटकोनी पॅटर्नमध्ये रूपांतरित झाले.

यासोबतच शास्त्रज्ञ रपीन यांनी सांगितलं की, वेट अँड ड्राय सायकल आणि षटकोनी पॅटर्न यामुळे हे सिद्ध होतं की, पृथ्वीप्रमाणेच मंगळ या ग्रहावर देखील वातावरण असून यामुळे आण्विक उक्रांती सुलभ होण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळावर जीव जन्माला येऊ शकतात. खरंतर माणसाच्या जीवनासाठी पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. यानुसार पाण्याचा शोध घेणे देखील गरजेचे असून मंगळावर पाण्याचा शोध घेण्यासाठी भारत देखील प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मंगळावर कार्बन ड्राय ऑक्साईड नायट्रोजन ऑर्गन आणि ऑक्सिजन देखील उपलब्ध आहे.