समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले; शास्त्रज्ञांनी वर्तवली धोक्याची घंटा

टाइम्स मराठी । हवामान बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर देखील दिसून येत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोपर्निकस या देखरेख करणाऱ्या एजन्सीच्या मते, समुद्राचे पाणी आतापर्यंत सर्वात जास्त उष्ण तापमान पर्यंत पोहोचले आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान 20.96 सेल्सियस एवढे आहे. पृथ्वीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यात समुद्राचा महत्त्वाचा रोल आहे. समुद्र पृथ्वीवरील अर्धे ऑक्सिजन तयार करत असतो. त्याचबरोबर हवामानाचा स्वरूप देखील नियंत्रित ठेवत असतो.

   

महासागराचा तापमानामध्ये होणाऱ्या वाढीचा त्यांच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उष्ण तापमानामुळे पाणी कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता गमावते. यामुळे पृथ्वीच्या तापमान वाढीचा वेग जास्त वाढू शकतो. एवढेच नाही तर यामुळे हिमनद्या वितळण्याचा वेग देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि याचा परिणाम समुद्राच्या पातळीमध्ये दिसून येतो. हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून बराच भूभाग पाण्याखाली जाण्याची शक्यता असते.

नॅशनल ओशनिक अँड ऑटोमोस्पिरिक ऍडमिनिस्ट्रेशनचे शास्त्रज्ञ, डॉ. कॅथरीन लेस्नेस्की यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, महासागराचा तापमान वाढीचा परिणाम हा समुद्रात राहणाऱ्या जीवांवरही पडत असतो. उष्ण तापमान आणि उष्ण पाण्यामुळे मासे आणि व्हेल थंड पाण्याच्या शोधात जाऊ शकतात. एवढेच नाही तर अन्नाच्या कमतरतेमुळे शार्क जास्त आक्रमक होण्याची शक्यता देखील या काळात असते. इंटरगव्हर्मेंट पॅनल क्लायमेट चेंज यांच्यानुसार, 1982 ते 2016 पर्यंतच्या काळात समुद्राच्या हिट वेव ची फ्रिक्वेन्सी दुप्पट वाढली असून तीव्र आणि लांब झाली आहे. जून मध्ये ब्रिटन मध्ये पाण्याचे तापमान हे तीन सेल्सिअस ते पाच सेल्सिअस पेक्षा जास्त मोजण्यात आले होते. मागच्या आठवड्यामध्ये फ्लोरिडा मध्ये समुद्राच्या पुष्ठभागाचे तापमान 38.44 सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.