सेकंड जनरेशन Skoda Kodiaq लवकरच भारतात येणार; पहा काय फीचर्स मिळणार

टाइम्स मराठी । Skoda कंपनीने सेकंड जनरेशन Skoda Kodiaq हि SUV कार लॉन्च केली आहे. कंपनीने यामध्ये बरेच अपडेटेड फीचर्स आणले आहेत. त्यामुळे आधीच्या कार पेक्षा या नव्या जनरेशनच्या SUV मध्ये तुम्हाला बरेच बदल पाहायला मिळतील. सध्या ही SUV Car युरोपमध्ये  लाँच झाली असून 2024 मध्ये ती भारतीय मार्केट मध्ये धुमाकूळ घालू शकते. आज आपण जाणून घेऊया या न्यू जनरेशन  Skoda Kodiaq SUV चे खास फीचर्स ….

   

स्पेसिफिकेशन

Skoda Kodiaq या SUV मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन इंजिन ऑप्शन उपलब्ध आहे. त्यानुसार 1.5 लिटर TSI इंजिन  यामध्ये वापरण्यात आले आहे. यासोबतच या एसयूव्ही मध्ये हायब्रीड पावर ट्रेन देखील उपलब्ध आहे. त्यानुसार या SUV कार मध्ये 1.5 लिटर  TSI माइंड हायब्रीड, 2.0 लिटर TSI 4WD आणि 2.0 लिटर TDI इंजिन सुद्धा देण्यात आले आहे. कंपनीने या कार मध्ये 25.7 kwh बॅटरी प्रदान केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही SUV
कार 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करते.

फीचर

Skoda Kodiaq या SUV मध्ये 13 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने ड्युअल टोन डॅशबोर्ड देखील यामध्ये उपलब्ध केला आहे. या SUV मध्ये  स्कोडाचे नवीन दोन स्पोक स्टिअरिंग व्हील   आणि 10 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे.Skoda Kodiaq ग्राहकांसाठी ५ आणि ७ सीटर कॉन्फिगरेशन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने या एसयूव्ही मध्ये ADAS सेफ्टी फीचर्स देखील दिलेले आहेत.

किंमत –

या नव्या Skoda Kodiaq च्या किमतीबाबत कंपनीने अजून तरी कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु या गाडीची किंमत ४० लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.