पृथ्वीवरील पाण्याचे रहस्य उलघडले; संशोधकांनी लावला महत्वपूर्ण शोध

टाइम्स मराठी । आपण राहत असलेल्या पृथ्वीवर पाणी कसे आले हा प्रश्न सर्वांनाच पडतो. या प्रश्नांवर अनेक वेगवेगळी कारणे दिली जातात. मात्र आता थेट संशोधकांकडून पृथ्वीवरील पाण्याचे रहस्य उलघडण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर पाणी हे सर्वात उशीरा आले. त्याअगोदर कोरड्या आणि खडकाळ पदार्थांपासून पृथ्वीची निर्मीती झाली असावी. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पृथ्वीवरील पाण्यावर संशोधन केले असून यासंदर्भात त्यांनी काही खूलासे केले आहेत.

   

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या निर्मितीच्या १५ टक्क्यांमध्ये हे पाणी आणि इतर जीवनावश्यक गोष्टी आल्या आहेत. तसेच पृथ्वी ही ४.५ अब्ज वर्षे जुनी असून संशोधक तिच्या निर्मीतीवर अभ्यास करीत आहेत. यासाठी त्यांना पृथ्वीच्या आतील भागात असलेल्या गरम मॅग्माची तपासणी करावी लागणार आहे. मॅग्मा लाव्हाच्या रूपात पृष्ठभागावर येतो. त्यामुळे त्याचा अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलघडा होईल अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे पहिल्यांदा संशोधनाचा भाग म्हणून मॅग्माचा अभ्यास करण्यात येणार आहे.

पृथ्वीवर मॅग्मा हा वेगवेगळ्या स्तरावर आढळून येतो. त्याच्या वरचे आवरण हे १५ किमी खोलीपासून सुरु होते. तर ६८० किमीपर्यंत ते विस्तारलेले असते. याच्या खालच्या आवरणाचा विस्तार विस्तार ६८० किमी ते २९०० किमीपर्यंत असतो. संशोधन या सर्व गोष्टींवर अभ्यास करुन पृथ्वीवर पाणी कसे आले याचा शोध घेणार आहेत. तसेच अंतराळावरील अनेक बाबींचे रहस्य अद्याप उघडले नाही. मात्र जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा ती एक कठोर आणि कोरडी होती. त्यानंतरच्या काळातच पऋथ्वीवर पाणी जनजीवन निर्माण झाले. असा दावा संशोधकांनी व्यक्त केला आहे.