“हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद” म्हणत सीमा हैदरने फडकवला तिरंगा

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपासून Pubg खेळत खेळत प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांचे प्रकरण जोरदार गाजत आहे. प्रियकरासाठी आणि प्रेमासाठी पाकिस्तानातून सीमा भारतात आली आणि आता भारताचीच झाली. याचे कारण म्हणजे सीमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे सर्वजण स्वातंत्रता दिवस साजरा करत असून घर घर तिरंगा या मोहिमेच्या माध्यमातून सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी त्यांच्या नोएडा येथीलघरात ध्वजावंदन केले. यासोबतच तिने घोषणाबाजी देखील केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

   

पाकिस्तानातील सिंध प्रांतातून आलेल्या सीमाने रविवारी नोएडा येथील निवासस्थानी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने ध्वजारोहण केले. आणि भारत माता की जय हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. ती भारतात आल्यानंतर बऱ्याच घटना घडल्या. यानंतर गदर चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी तिचे धाडसाचे कौतुक केले होते. त्यानंतर एका बिझनेसमॅनने तिला जॉब देखील ऑफर केला. यासोबतच चित्रपटात काम करण्याची संधी देखील तिला देण्यात येणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यातच आता सीमाचा भारताच्या बाजूने घोषणाबाजी देतानाचा विडिओ सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देताना सीमा हैदर दिसत आहे. यासोबतच तिने तिरंग्याची साडी नेसली असून डोक्यावर जय मातादी ची ओढणी ओढलेली आहे. या सोबतच तिच्या हातामध्ये तिरंगा पकडलेला दिसून येत आहे. ती नुकताच प्रदर्शित झालेला गदर 2 देखील पाहणार असल्याचे तिने सांगितलं.

दरम्यान, सीमा हैदर ISI ची एजंट असल्याचा आरोप देखील तिच्यावर करण्यात येत आहे. तिची उत्तर प्रदेश अँटिटेरर्स कोड आणि इंटेलिजन्स ब्युरो कडून चौकशी करण्यात येत असून लवकरात लवकर तिला भारताच्या बाहेर काढण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सीमा हैदर चे मोठ्या प्रमाणात चाहते आणि विरोधक देखील आहेत.