कुंभ राशींच्या लोकांवर सुरू आहे शनि साडेसाती; या उपायांनी करा दूर

टाइम्स मराठी | बऱ्याचदा शनी हे नाव ऐकताच काही जणांच्या तोंडावर बारा वाजता. कारण शनी मागे लागणं हे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये शनी ग्रहाला पापी ग्रह देखील म्हंटल जातं. वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. या बारा प्रकारांपैकी ज्या राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती असते त्या लोकांचे चांगले दिवस संपून वाईट दिवस सुरू होतात. शनि देव कर्माचा दाता आणि न्याय करता म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तरीही शनि देवाला बरेच लोक घाबरतात. कारण मानवाला त्याच्या कर्माचे फळ आणि शिक्षा देखील शनिदेव देतात. आणि यासोबतच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शनिदेव चांगले फळ देत असतो.

   

ज्योतिष शास्त्रानुसार सध्या कुंभ, मकर आणि मीन या तीनही राशींची व्यक्तींची साडेसाती चालू आहे. त्यात कुंभ राशींच्या व्यक्तींचा साडेसातीचा दुसरा चरण सुरू असून कुंभ (Aquarius) राशींच्या व्यक्तींवर प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही परिणाम दिसत आहेत. यासोबतच मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 ला संपणार आहे. आणि तीन जून 2017 मध्ये कुंभ राशींच्या व्यक्तींना साडेसाती पासून मुक्ती मिळेल. तुम्ही देखील कुंभ राशी मध्ये मोडत असाल तर तुम्ही या साडेसाती पासून वाचण्यासाठी काही उपाय करू शकतात.

कुंभ राशीचा स्वामी हा शनिदेव आहे. शनि देवाचे आराध्य दैवत महादेव आहे असं सांगितले जाते. त्यानुसार शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींनी महादेवाची पूजा करणे गरजेचे आहे. जेणेकरून शनिदेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. यासाठी खालील उपाय करणे गरजेचे आहे.

1) शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात पहिले स्नान केल्यानंतर पाण्यामध्ये काळी तीळ मिक्स करून शिवाला अभिषेक करा.

2) साडेसाती पासून वाचण्यासाठी कुंभ राशींच्या व्यक्तींनी दररोज शनी बीज मंत्र चा जप करा. यावेळी ॐ प्राँ प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा.

3) श्रीरामांचे भक्त हनुमान यांची पूजा केल्यावर देखील सनी दोषापासून मुक्ती मिळते असं म्हंटल जातं. त्यामुळे दररोज हनुमानाची पूजा आणि उपासना करा.

4) यासोबतच हनुमान चालीसा आणि सुंदर कांड यांचे वाचन करा.

5) ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी कधी चुकूनही केस कापू नका. यासोबतच शनिवारी तामसिक भोजन करणे टाळा. जेणेकरून शनिदेव प्रसन्न होतील आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव होईल.