शोएब- सानियाचा घटस्फोट? ‘त्या’ Insta Bio मुळे चर्चांना उधाण

टाइम्स मराठी । भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे अनेक दिवसांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा चर्चा रंगलेल्या असतानाच दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे देखील बोलले जात होतं. एवढेच नाही तर त्यांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू केल्याच्या काही अफवा पसरत होत्या. कैच दिवसानंतर या चर्चा थांबल्याही होत्या परंतु आता पुन्हा एकदा या दोघांचा घटस्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

   

शोएब मलिक याने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर बदल केल्यामुळे या दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी शोएब मलिकच्या इंस्टाग्राम बायो मध्ये सुपर वुमन सानिया मिर्झाचा नवरा अस लिहिलेले होते. परंतु आता हे बायो बदलून live Unbroken असं टाकण्यात आलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार शोएब मलिक ने सानिया मिर्झाची फसवणूक केल्याची माहिती उघड झाली होती. त्याचबरोबर शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर सोबत अफेअर असून त्या दोघांचे व्हिडिओज फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण या फोटोज वर आयशा ने हे जाहिरातीचे फोटो असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सानिया आणि शोएबचा नवीन टॉक शो द मिर्झा मलिक शो सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व अफवा असल्याचे उघड होतं. हा द मिर्झा मलिक शो फक्त पाकिस्तानी चॅनलवर प्रसारित करण्यात येत आहे.

shoaib malik

एप्रिल 2010 मध्ये झालं होत सानिया- शोएबचे लक्ष्य –

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक च्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झालेली असून त्यांचं लग्न एप्रिल 2010 रोजी झाले होते. आता सानिया मिर्झाचे वय 35 आणि शोएब मलिक चे वय 40 आहे. काही दिवसांपूर्वी शोएब आणि सानिया यांनी एकत्र मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी शोएबने बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. परंतु सानिया मिर्झा ने याबद्दल कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. परंतु सध्या इंस्टाग्राम वर शोएब मलिक च्या इंस्टाग्राम पेजवर करण्यात आलेल्या बदलामुळे बरेच प्रश्न निर्माण होत सानिया शोएबचा घटस्फोट झाला आहे का अशा चर्चांना उधाण येत आहे