भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींची नात आहे ‘हि’ अभिनेत्री, रणबीर कपूरसोबत केलंय काम; पहा फोटो

टाइम्स मराठी टीम । अभिनेत्री म्हटलं कि ती एक तर कोणत्यातरी कलाकाराची मुलगी असते किंवा चित्रपट निर्मात्याच्या घरातील कोणीतरी असते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींची नात आहे. खूप कमी लोकांना या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या या नात्याबाबत माहिती आहे. रणबीर कपूरसोबत चित्रपटात काम केल्याने या अभिनेत्रीला एक वेगळी ओळख प्राप्त झालीय.

   

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नात फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. एवढेच नाही तर तिने रणबीर कपूर, जिमी शेरगिल यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत. अभिनेत्री श्रेया नारायण (Shreya Narayan) सर्वांनाच माहिती आहे मात्र तिच्या या नातेसंबंधांबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. श्रेया बॉलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत दिसली नसली तरी तिने आजवर अनेक छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत.

TV वरून अभिनयात पदार्पण

श्रेया केवळ अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. सोनी टीव्हीच्या ‘पावडर’ या शोमधून श्रेयाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

साहेब बीवी और गँगस्टरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण

श्रेयाने 2011 मध्ये तिग्मांशू धुलियाच्या ‘साहब बीवी और गँगस्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने ‘महुआ’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुडा होते. याशिवाय तिने ‘रॉकस्टार’, ‘राजनीती’, ‘दस्तक’, ‘तनु वेड्स मनू’, ‘सुपर नानी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘सुपर नानी’मध्ये तिने एका मानसिक आजारी मुलीची भूमिका साकारली होती.

कोण आहे श्रेया? (Shreya Narayan)

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नात असलेल्या श्रेयाचा जन्म बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झाला. यांनतर श्रेयाने जयपूर येथे आपले शिक्षण पूर्ण केले. श्रेयाने कमी कालावधी चित्रपटश्रुष्टीत आपले नाव कमावले. मात्र करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना श्रेयाच्या आईला कॅन्सर झाल्याचे समोर आले. यानंतर श्रेयावर दुख्खाचा डोंगर कोसळला.