टाइम्स मराठी । ऑनलाइन पद्धतीने फ्रॉड करणे हे सर्वांसाठी अत्यंत धोक्याचं असून यामध्ये सिम कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. बऱ्याच जणांकडे दहा पेक्षाही जास्त सिम कार्ड उपलब्ध असतात. ज्याचा वापर चुकीच्या पद्धतीने देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे सिम कार्डची संख्या रोखण्यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे. ज्यामुळे फ्रॉड होण्यापासून बचाव होईल आणि सिम कार्डची संख्या कंट्रोल मध्ये राहील. सरकार लवकरच सिम कार्डची ही नवीन नियमावली प्रसिद्ध करू शकत.
यापूर्वी एका आयडीवर 9 सिम कार्ड आपण घेऊ शकत होतो. परंतु आता आपण एका आयडीवर फक्त चारच सिमकार्ड घेऊ शकतो. त्याचबरोबर फ्रॉड सिम कार्ड साठी संचारसाठी पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे. ज्यामधून फ्रॉड सिम कार्ड ब्लॉक करण्यात येईल. टेलिकॉम मिनिस्टर अश्विन वैष्णव यांनी एका आयडीवर चार सिम कार्ड देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकार सिम कार्ड ची नवीन नियमावली पब्लिक करू शकतात. त्याचबरोबर केंद्र सरकार ग्राहक पडताळणी प्रक्रिया डिजिटली करू शकते.
सरकारने सुरू केलेल्या या नियमानुसार संचारसाथी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या आयडीवर किती सिम कार्ड आहेत याची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर जर तुमच्या नावाने एखादे फ्रॉड सिम कार्ड असेल तर त्याची इन्फॉर्मेशन काढून सिम ब्लॉक केले जाईल. त्यासाठी सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेणार आहे. म्हणजेच आता टेलिकॉम कंपनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करत आहे. यामुळे अनोळखी कॉल आणि फ्रॉड कॉलिंग वर निर्बंध लावण्यात येतील.