Sim Card विक्रेत्यांना जबर दणका!! सरकारने घेतला मोठा निर्णय

टाइम्स मराठी । आजकालच्या ऑनलाईन जमान्यात फ्रॉड होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादा फ्रॉड कॉल आल्यानंतर आणि आपल्या अकाउंट मधून पैसे गेल्यानंतर आपण जेव्हा फसवणूक करण्यात आलेल्या सदर नंबर वर कॉल करतो तेव्हा तो नंबर स्विच ऑफ करण्यात आलेला असतो. अशा प्रकारच्या फ्रॉडींगच्या घटना रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत असून सरकारने आता आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सिम कार्ड (Sim Card Dealers) विक्रेत्यांना सिम विकण्यासाठी पोलीस वेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे.

   

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की, आजकाल सिम कार्ड विक्रेत्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्याचा चुकीचा परिणाम वर देखील मोठ्या प्रमाणात होतो. सिम कार्ड धारकांकडून फ्रॉड व्यक्तींना सिम कार्ड पुरवले जातात. परंतु आता मोठ्या प्रमाणात सिमकार्ड विकण्यासाठी सिम कार्ड डीलर्सला पोलिस वेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतरच ते सिम विकू शकतील. या निर्णयामुळे फ्रॉड होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. सरकारकडून यासाठी नियमावली जारी करण्यात आले आहे, यानुसार जर तुम्ही पोलिसांकडून वेरिफिकेशन केल्या शिवाय सिम कार्ड विकत असाल तर तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. एवढेच नाही तर तुमच्या दुकानाचे किंवा व्यवसायाचे देखील आता केवायसी करावे लागेल.

सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिम कार्ड मुळे होणारे फ्रॉड रोखण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एका आयडीवर 9 सिम कार्ड आपण घेऊ शकत होतो. परंतु आता आपण एका आयडीवर फक्त चार सिम घेऊ शकतो. त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी फ्रॉड सिम कार्ड साठी संचारसाथी पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. ज्यामधून फ्रॉड सिम कार्ड ब्लॉक करण्यात येत आहे. आतापर्यंत 52 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आलेले असून 67 हजार डीलर्स ला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. एवढेच नाही तर मे महिन्यापासून ते आत्तापर्यंत सिम कार्ड डीलरच्या विरोधात 300 एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

एकाच व्यक्तीच्या नावे 658 सिम कार्ड-

देशामध्ये दररोज सिम कार्ड स्कॅम उघड होत आहेत. नुकताच पोलिसांनी एक अशाच पद्धतीने होणाऱ्या फ्रॉडचा पर्दाफाश केला. या घटनेमध्ये आधार कार्डचा चुकीचा वापर करण्यात येत होता. एकाच आधार कार्डवर 658 सिम कार्ड जारी करण्यात आलेले होते. आणि हे सर्व सिम कार्ड वापरात देखील होते. तमिळनाडूच्या एका सायबर क्राईमिंगने या आठवड्यामध्ये एका व्यक्तीकडून 150 सिम कार्ड जप्त केले आहे. मागच्या चार महिन्यांमध्ये तमिळनाडूच्या सायबर क्राईम विंग ने 25,135 सिम कार्ड ब्लॉक केले आहे. एवढेच नाही तर विजयवाडा मध्ये एका ठिकाणी एकाच व्यक्तीच्या नावावर 658 सिम कार्ड जारी केलेले होते. हे सर्व सिम कार्ड पोलूकोंडा नावावर घेण्यात आलेले होते. हा व्यक्ती मोबाईल शॉपवर सिम वितरित करतो. पोलिसांनी हे सर्व सिम ब्लॉक केलेले आहे.