Skoda ने लाँच केलं Kushaq आणि Slavia चे अपडेटेड Elegance Editions

टाइम्स मराठी । Skoda कंपनीच्या  Kushaq आणि Slavia या दोन अप्रतिम कार भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. आता कंपनीने Kushaq आणि Slavia चे अपडेटेड Elegance Editions लाँच केलं आहे. कारमध्ये बरेच फिचर्स आले असून ही कार पूर्णपणे लक्झरी लूक देते. स्कोडा कंपनीची ही लिमिटेड एडिशन कार आहे. कंपनीने ही कार पूर्णपणे ब्लॅक एक्स्टिरियर फिनिशिंग सह डेव्हलप केली आहे. आज आपण जाणून घेऊया या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

एक्स्टर्नल डिझाईन

Skoda च्या Kushaq आणि Slavia च्या अपडेटेड Elegance Editions मध्ये नवीन ग्रील आणि टेलगेट मिळतील. दोन्ही कार मध्ये क्रोम चा वापर करण्यात आला आहे. या कारमध्ये  puddle lamps सोबत 17 इंच वेगा अलॉय व्हील वापरण्यात आले आहे. ही लिमिटेड एडिशन कार कंपनीने स्पेशली ब्लॅक एक्स्टेरियल फिनिशिंग सह डेव्हलप केली आहे. त्यामुळे या कारला एक्स्टर्नली अप्रतिम लुक मिळतो.

इंटर्नल डिझाईन

NEW SKODA KUSHAQ आणि SLAVIA ELEGANCE या कारच्या इंटिरियर बद्दल बोलायचं झालं तर, या कारमध्ये नवीन मॅट, ॲल्युमिनियम पेडल देण्यात आले आहे. या दोन्ही कारच्या स्टिअरिंग आणि कुशन वर  तुम्हाला Elegance चा बॅज बघायला मिळेल. या कार मध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. जेणेकरून कारला लक्झरी लुक मिळेल. स्कोडा ने या कारमध्ये डिजिटल क्लस्टर सह 6 स्पीकर ऑफर केले आहे.

स्पेसिफिकेशन

NEW SKODA KUSHAQ आणि SLAVIA ELEGANCE ही कार 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सह उपलब्ध आहे. हे इंजिन 150 hp पावर जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतात. कंपनीने कार मध्ये मोठ्या साईज मध्ये ट्यूबलेस टायर उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर मोठे हेडलाईट देखील यामध्ये वापरण्यात आले आहेत.

किंमत किती?

NEW SKODA KUSHAQ आणि SLAVIA ELEGANCE या दोन्ही कारच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर, NEW SKODA KUSHAQ ची एक्स शोरूम किंमत 17.52 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आणि SLAVIA ELEGANCE या कारची एक्स शोरूम किंमत 18.31 लाख रुपये एवढी आहे. या दोन्ही कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या  creta आणि verna या कार सोबत प्रतिस्पर्धा करेल