Skoda Slavia Matte Edition : Skoda ने लाँच केली दमदार गाडी; पहा किंमत आणि फीचर्स

Skoda Slavia Matte Edition | प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Skoda ने Skoda Slavia Matte Edition लाँच केली आहे. मॅट एडिशन मध्ये लॉन्च करण्यात आलेली ही सेडान कार प्रीमियम कलर मध्ये अप्रतिम दिसते. कंपनीने ही कार वेगवेगळ्या व्हेरियंट मध्ये लॉन्च केली आहे. जाणून घेऊया या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

   

Skoda Slavia Matte Edition या सेडान कार मध्ये मॅट कार्बन स्टील कलर ऑप्शन देण्यात आला आहे. या कारचे दरवाजे, हँडल आणि विंग मिरर्स ग्लोस ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे. आणि फ्रंट ग्रील विंडोच्या चारही साईडने क्रोम एक्सेंट देण्यात आले आहे. एवढेच नाही तर कंपनीने या नवीन एडिशन कार मध्ये टॉप स्पेक स्टाईल ट्रिम मध्ये पावर फ्रंट सीट्स उपलब्ध केल्या आहेत.

फीचर्स– Skoda Slavia Matte Edition

या सेडान कार मध्ये अप्रतिम इंटेरियर आणि बरेच वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, लेदररेट अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, क्रुझ कंट्रोल, 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनरुफ, सहा एअर बॅग यासारखे बरेच स्टॅंडर्ड आणि सेफ्टी फीचर्स यामध्ये देण्यात आले आहे.

इंजिन-

Skoda Slavia Matte Edition या सेडान कार मध्ये 1.0 लिटर TSI मोटर आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन हे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. यातील 1.0 TSI मोटर 115 ps पावर आणि 178 nm पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर टर्बो इंजन 150 पीएस पावर आणि 250 nm पीक टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. एवढेच नाही या इंजन सोबत 7 स्पीड क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन सुद्धा देण्यात आला आहे.

किंमत किती?

Skoda Slavia Matte Edition ची किंमत 10.89 लाख ते 19.12 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. ही कार Volkswagen Verts, Maruti Suzuki Ciaz, Honda City आणि Hyundai Verna यासारख्या गाड्यांना टक्कर देईल.