तुम्हांलाही अगदी Slim Mobile पाहिजे? मग ‘हे’ 4 स्मार्टफोन पहाच

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे मोबाईल देखील गरजेचा झाला आहे. आजकाल स्मार्टफोनवरच ऑफिशियल पर्सनल यासारखे कामे केली जातात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोन हवा असतो. बऱ्याच जणांना कॅमेरा, फीचर, स्मार्टफोन मध्ये वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटीज यासोबतच स्मार्टफोन स्लिम देखील असणे आवडते. तर काही जणांना वजनाने हलका फुलका आणि स्लिम मोबाईल आवडतो. तुम्ही सुद्धा अशाच स्लिम मोबाईलच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट स्लिम मोबाईल बद्दल माहिती सांगणार आहोत. मग तुम्हीच ठरवा कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट ठरेल

   

१) iQ00 Z7 Pro –

iQ00 Z7 Pro हा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये उपलब्ध असून स्लिम डिझाईनमध्ये येतो. या स्मार्टफोनची थिकनेस 7.3 mm एवढी असून 175 ग्राम चा हा स्मार्टफोन आहे. iQ00 Z7 Pro हा स्मार्टफोन कर्व्ह डिस्प्ले, स्लिम साईड बेजल्स आणि सेल्फी कॅमेरा साठी सेंटर पंच होल कट आउट मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये 6.78 इंच चा कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह 1080×2400 पिक्सल रिझोल्युशन 120 Hz रिफ्रेश रेट मध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. iQ00 Z7 Pro मध्ये डायमेंसिटी 7200 प्रोसेसर उपलब्ध आहे. मोबाईलला 4600mAh बॅटरी मिळत असून ही बॅटरी 66 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

iQ00 Z7 Pro

iQ00 Z7 Pro या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट सह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेंसर, 2 मेगापिक्सल चा सेकंडरी शूटर कॅमेरा तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल 8 GB+256 GB आणि 8GB + 128GB स्टोरेज मध्ये मिळत आहे. त्याची किंमतही अनुक्रमे 24,999 आणि 23,999 रुपये आहे.

२) Vivo V29e 5G

Vivo V29e 5G या स्मार्टफोनची थिकनेस 7.75mm एवढी असून स्मार्टफोन फक्त 185 ग्रॅम चा आहे. या मोबाईल मध्ये 6.78 इंचाचा फुल HD+AMOLED 3D कर्व्ह डिस्प्ले मिळतोय. Vivo V29e 5G मध्ये Qualcomn Dnapdragon 695 प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच Android 13 वर आधारित सॉफ्टवेअर स्क्रीन यामध्ये देण्यात आले आहे. मोबाईलच्या डिझाईनबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये ड्युअल पॅटर्न बॅक, डायमंड कट डिझाईन, ग्लास फिनिश देण्यात आली आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये कलर चेंज करणारा ग्लास बॅग पॅनल देण्यात आला आहे. त्यानुसार स्मार्टफोन मध्ये आर्टिस्टिक रेड आणि आर्टिस्टिक ब्ल्यू कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यासह अल्ट्रा लार्ज पेपर चेंबर कुलिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. जेणेकरून मल्टीटास्किंग साठी मदत मिळेल.

Vivo V29e 5G

vivo V29e 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर , यात OIS बेस्ड प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा, अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा 8 MP आणि 50 MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या मोबाईलची किंमत 26,999 रुपये एवढी आहे.

३) Xiaomi Redmi 12 5G

Xiaomi Redmi 12 5G या स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर या मोबाईलची थिकनेस 8.1 MM असून वजन 199 ग्राम एवढे आहे या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 Soc प्रोसेसर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 6.79 च्या फुल एचडी डिस्प्ले सोबत येतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. यामध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 18 W चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर 50 MP चा प्रायमरी कॅमेरा, 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,999 एवढी आहे.

Xiaomi Redmi 12 5G

४) Realme C53

Realme C53 या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच एलसीडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. या डिस्प्ले मध्ये ड्यू ड्रॉप नॉच उपलब्ध आहे. मोबाईलची थिकनेस 7.9mm एवढी असून वजन 186 ग्रॅम आहे. यासोबतच Realme C53 या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 5000mAh बॅटरी असून 18 W चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme C53

Realme C53 च्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर,या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहेत्याचबरोबर मुख्य सेंसर सह 108 MP देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्रोमावर 10,999 एवढी असून अमेझॉन वर 14,999 रुपये एवढी आहे.