Smart TV Under 10000 : 10000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Xiaomi आणि Infinix चे हे Smart TV

Smart TV Under 10000 । वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेला त्यांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यातच जर स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर या टीव्हीच्या किमती ऐकूनच सर्वसामान्य नागरिक टीव्ही घेण्याचा विचार सोडून देतात. परंतु आता फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलच्या माध्यमातून तुम्ही कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. या फ्लिपकार्टच्या डील मध्ये तुम्हाला Infinix , Xiaomi थॉमसन या कंपनीचे स्मार्ट टीव्ही एमआरपी पेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आज आम्ही तुम्हाला 10000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या 3 स्मार्ट TV बद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात

   

१) Infinix X3in 32 inch HD ready LED smart Android TV 2023

Infinix कंपनीच्या या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 1366×768 पिक्सल रिझोलूशन देण्यात आले असून या स्मार्ट टीव्ही मध्ये 32 इंच डिस्प्ले उपलब्ध आहे. याचा डिस्प्ले डिस्प्ले 60 Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्ही सोबत 20 W साऊंड आऊटपुट देण्यात आले आहे. या स्मार्ट टीव्ही ची MRP प्राईज 10,999 रुपये असून फ्लिपकार्ट डील मध्ये तुम्ही हा स्मार्ट टीव्ही कमी किमतीत खरेदी करू शकतात. त्यानुसार तुम्हाला 47% डिस्काउंट देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही 9,999 मध्ये हा स्मार्ट टीव्ही घरी आणू शकतात. त्याचबरोबर कंपनीकडून बँक ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. बँक ऑफरनुसार स्मार्ट टीव्ही ची किंमत पाचशे रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. यासोबतच एक्सचेंज ऑफर नुसार 1400 रुपयांपर्यंत सूट तुम्हाला मिळू शकते.

२) Thomson Alpha 32 HD ready LED smart Linux TV 2022 ड़डिशनल– Smart TV Under 10000

थॉमसन कंपनीच्या या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलायचं झालं तर ग्राहकांना या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून 30 w साऊंड आऊटपुट देण्यात येणार आहे. जेणेकरून ग्राहकांना होम थेटरचा आनंद घेता येईल. या स्मार्ट टीव्ही ची किंमत 14,999 रुपये एवढी आहे. फ्लिपकार्टच्या डील मध्ये तुम्हाला 33% डिस्काउंट मध्ये हा स्मार्ट टीव्ही मिळू शकतो. या डील नुसार तुम्हाला 9,999 मध्ये हा स्मार्ट टीव्ही मिळेल. याशिवाय स्मार्ट टीव्हीवर पाचशे रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देखील देण्यात येणार आहे. जर तुम्ही तुमच्याकडे असलेला टीव्ही एक्सचेंज करून हा नवीन स्मार्ट टीव्ही घेणार असाल तर तुमच्यासाठी एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आले आहेत. या एक्सचेंज ऑफर नुसार तुम्हाला 1400 रुपयांची सूट मिळू शकते.

३) MI 4A 32 inch HD ready LED smart Android TV

शाओमी कंपनीच्या या स्मार्ट टीव्ही (Smart TV Under 10000) मध्ये 32 इंच चा एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. हा स्मार्ट टीव्ही मध्ये 20W साउंड आऊटपुट देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 14 हजार 999 आहे. ऑफर नुसार या टीव्हीवर कंपनीकडून 33% डिस्काउंट देण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही 9999 मध्ये हा टीव्ही खरेदी करू शकतात. आणि बँक ऑफरनुसार 500 रुपयांची सूट देखील तुम्हाला मिळू शकते. याशिवाय तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन 1400 रुपये पर्यंत सूट मिळवू शकतात.