Smart TV Under 20000 : दिवाळी ऑफर!! 43 इंचाचा Smart TV मिळतोय अगदी स्वस्तात

टाइम्स मराठी । भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीला भारतामध्ये सोने खरेदी करणे आणि एखादी मोठी वस्तू खरेदी करणे याला शुभ मानले जाते. त्यानुसार बरेच जण, वाहन, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही देखील खरेदी करतात. तुम्ही देखील यंदा दिवाळीला Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आम्ही XIAOMI कंपनीच्या दिवाळी सेल बद्दल सांगणार आहोत. XIAOMI ने दिवाळी विथ MI सेल सुरू केला आहे. या सेलच्या माध्यमातून  ग्राहकांना 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये (Smart TV Under 20000) 40 इंच वाला ULTRA HD स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल.

   

काय आहे ऑफर – Smart TV Under 20000

Diwali With MI या सेलमध्ये Redmi Smart TV X43 या स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. ही Smart TV 42,999 रुपयामध्ये लॉन्च करण्यात आला होती. परंतु दिवाळी निमित्त कंपनीने ही स्मार्ट टीव्ही 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध केलाय. यासोबतच बँक ऑफर सोबतच EMI ऑफर देखील उपलब्ध आहे. बँक ऑफरनुसार हा स्मार्ट टीव्ही तुम्ही 19,249 रुपयांमध्ये (Smart TV Under 20000) खरेदी करू शकता. यासोबतच  फायनान्स ऑफरनुसार 5500 रुपयांच्या डाऊन पेमेंट वर तुम्ही टीव्ही घरी घेऊन जाऊ शकतात. त्यानुसार तुम्हाला 0% इंटरेस्टेड EMI द्यावा लागेल.

Redmi Smart TV X43 मध्ये 43 इंच चा 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये HDR स्क्रीन वापरण्यात आली असून डॉल्बी व्हिजन, HDR10, HLG, विविध पिक्चर इंजिन,  92%  DCI P3 आणि 85%  NTSC WIDE COLOR GAMUT यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्ट टीव्ही क्वाड कोर प्रोसेसरवर काम करतो . यामध्ये ग्राफिक साठी  MALI G52 MP2 देण्यात आले आहे.

Redmi Smart TV X43 या स्मार्ट टीव्ही मध्ये  वायफाय, ब्लूटूथ सपोर्ट उपलब्ध आहे. या डिवाइस ला तीन HDMI ,पोर्ट, दोन USB पोर्ट, 3.5 एमएम जॅक, AV आणि  ETHERNET स्लॉट देण्यात आले आहे. या स्मार्ट टीव्ही मध्ये क्रोम कास्ट, ओके गुगल, प्ले स्टोअर सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सल सर्च, लॅंग्वेज युनिव्हर्स, किड्स मोड, स्मार्ट रेकमंडेशन, यूजर सेंटर, लाइव चैनल सुविधा उपलब्ध आहे. ही स्मार्ट टीव्ही पॅचवॉल वर काम करते.

या स्मार्ट टीव्ही मध्ये 2 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज उपलब्ध आहे. कंपनीने स्मार्ट टीव्ही मध्ये म्युझिक किंवा साऊंड कॉलिटी साठी रेडमी स्मार्ट टीव्ही 30 W क्षमता असलेले 2 पावरफुल स्पीकर सपोर्ट दिले आहे. हे स्पीकर डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी ऍटमॉस सोबतच  DTS वर्चुअल आणि DTH HD टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे.