9000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ जबरदस्त Mobile

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन शिवाय कोणतेच काम होत नाही. मोबाईल सुद्धा एक जीवनावश्यक गोष्ट बनली असून सर्वानाच याचे वेड आहे. त्यामुळे बाजारात सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किमतीत मोबाईल उपलब्ध असतात. तुम्हीही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्याकडे आर्थिक ताकद कमी असेल, म्हणजेच पैशाची अडचण असेल तर आज आम्ही तुम्हाला अवघ्या ९००० रुपयांपेक्षा कमी किमतीतील असे ५ मोबाईल बद्दल माहिती देणार आहोत जो खरेदी करणं तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.

   

1) Intel p40+

स्मार्टफोन ब्रांड इंटेल कंपनीचा स्मार्टफोन तुम्ही परवडणाऱ्या किमतीमध्ये घेऊ शकतात. या स्मार्टफोनची किंमत अमेझॉन वर 8,499 एवढी आहे. या मोबाईल मध्ये पंच होल कटआउट डिस्प्ले यासह 7000 mah बॅटरी देण्यात आली आहे. इंटेल P40 प्लस हा मोबाईल ड्युअल सिम सपोर्ट आणि अँड्रॉइड 12 यासह उपलब्ध असून 6.8 इंचचा HD प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यासोबतच 90 हर्टज रिफ्रेश रेट आणि 720 ×1640 पिक्सल रिझोल्युशन उपलब्ध आहे. या मोबाईल मध्ये 4 GB रॅम 128 GB स्टोरेज सपोर्ट देण्यात आला असून रॅम 4 जीबी वरून 8 जीबी व्हर्च्युली वाढवला जाऊ शकतो. त्याचबरोबर या फोनमध्ये ऑक्टा कोअर युनिसोक T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल ड्युअल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. तुम्ही हा मोबाइलला 408 रुपयांच्या EMI वर सुद्धा खरेदी करू शकता.

2) Tecno Spark 8 pro

Tecno Spark 8 pro या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच 1080×2460 पिक्सल रिझोल्युशन देण्यात आलेले असून FHD डिस्प्ले उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हिलियो G85 या प्रोसेसर काम करतो.Tecno Spark 8 pro यामध्ये 48 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आलेला असून 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये 4 जीबी रॅम सह 64 gb स्टोरेज उपलब्ध आहे. या मोबाईलची बॅटरी 5000 mAh एवढी आहे. ही बॅटरी 33w फास्ट चार्जिंग सपोर्ट सह उपलब्ध आहे. याची किंमत अमेझॉन वर 8099 रुपये एवढी असून सुरुवाती 389 रुपयांच्या ईएमआय वर तुम्ही खरेदी करू शकतात.

3) Samsung Galaxy M04

Samsung Galaxy M04 हा स्मार्टफोन अमेझॉन वर 8,499 एवढ्या किमतीत तुम्ही खरेदी करू शकतात. यासोबतच 382 रुपयांच्या सुरुवाती EMI वर देखील तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यामध्ये 6.5 इंच HD + डिस्प्ले देण्यात आलेला असून यामध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. यासोबतच मीडिया टेक हेलिओ P35 प्रोसेसर वर हा स्मार्टफोन काम करतो. या स्मार्टफोन मध्ये 13 MP कॅमेरा देण्यात आलेला आहे. कमी किमतीत उपलब्ध असलेला सॅमसंग कंपनीचा हा उत्तम मोबाईल आपण म्हणू शकतो.

4) Realme narzo N53

हा स्मार्टफोन अमेझॉन वर तुम्हाला कमी किमतीत मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच फुल HD डिस्प्ले देण्यात आलेला असून तो 90Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. Realme narzo N53 मध्ये 50 Mp कॅमेरा देण्यात आलेला असून 8Mp फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W Suppervooc चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये ४ जीबी रॅम देण्यात आलेली असून 64 जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएन्ट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला ॲमेझॉन वर 8,999 रुपयात उपलब्ध असून 200 रुपये ऑफ कुपन देण्यात येत आहे. या सोबतच तुम्ही 423 रुपये सुरुवाती EMI वर देखील खरेदी करू शकतात.

5) Realmi 9 Activ

या मोबाईल मध्ये चार जीबी आणि 64 जीबी स्टोरेज उपलब्ध असून यामध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 6.53 इंच डिस्प्ले देण्यात आलेला असून हा स्मार्टफोन OS अँड्रॉइड 10 वर काम करतो. यासोबतच फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा देण्यात आलेला असून 13 आणि 2 mp रियर कॅमेरा देखील यामध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मीडिया टेक हेलिओ G35 वर काम करतो. अमेझॉनच्या सेलवर तुम्ही हा स्मार्टफोन 8999 रुपयात खरेदी करू शकतात. या शिवाय 432 रुपये EMI वर खरेदी करण्याचा ऑप्शन देखील यात उपलब्ध आहे.