Snake Wine : देशी सोडा..बाटलीत साप असलेली ‘हि’ दारू पार झिंगाट करून सोडते! कुठे पितात अन किंमत काय?

टाइम्स मराठी टीम (Snake Wine) | गावाकडे देशी दारू पिणारे ढिगाने सापडतात तर शहरात रम, व्हिस्की, बिअर पिणारे चौकाचौकात असतात. पण तुम्ही कधी साप असलेल्या बाटलीतल्या दारूबाबत ऐकलंय का?. जगभरात वेवेगळ्या प्रकारची मद्य पिणारे लोक आहेत. अनेकवेळा सदर मद्य कसे बनवले जाते अन ते किती वर्ष जुने आहे यावरून त्याची किंमत ठरते. आज आम्ही तुम्हाला झिंगाट करून सोडणाऱ्या स्नॅक वाईंबाबत माहिती देणार आहोत.

   

कशी बनते स्नॅक वाईन?

आजवर आपण अनेकप्रकारच्या दारूंबाबत ऐकलेलं असेल पण स्नॅक वाईन हि अनेकांसाठी नवीन प्रकार आहे. भातापासून बनवलेल्या मद्यात साप टाकून बनवलेल्या दारूला स्नॅक वाईन म्हणतात असे बोललं जात. या अमानवी आणि निषेधार्ह कृत्याला अनेक ठिकाणी बंदी आहे. मात्र तरीसुद्धा काही विदेशी देशांत अशा प्रकारे तस्करी करून दारू बनवली जाते अन जास्त किमतीने विकली जाते.

जिवंत किंवा मृत साप एका बाटलीत ठेवून त्यात तांदूळ, गहू किंवा इतर धान्य अल्कोहोल टाकून आणि आंबायला महिन्यांपर्यंत सोडून देऊन हि दारू बनवली जाते. यासोबतच त्यात फॉर्मलडीहाइडही मिसळले जाते. व्हिएतनामीमध्ये सापाला पुरुषत्वाचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत सापापासून बनवलेली ही वाइन तिथे खूप लोकप्रिय आहे.

ते या देशांमध्ये तयार होते सापांपासूनची दारू (Snake Wine)

चीनमध्ये स्नेक वाईन तयार केली जाते. त्याला चिनी भाषेत पिनयिन आणि व्हिएतनामीमध्ये ख्मेर म्हणतात. हे प्रथम पश्चिम झोऊ राजवंशाच्या काळात तयार केले गेले. त्यानंतर ही वाइन चीनमध्ये खूप लोकप्रिय झाली. ही वाइन प्रामुख्याने औषधी म्हणून वापरली जाते. चीन व्यतिरिक्त, ही वाइन संपूर्ण आग्नेय आशिया, उत्तर कोरिया, लाओस, थायलंड, व्हिएतनाम, ओकिनावा (जपान) आणि कंबोडियामध्ये बनविली जाते.

अनेक रोगांवर उपचारासाठी उपयुक्त

कुष्ठरोग, अति घाम येणे, केस गळणे, कोरडी त्वचा अशा अनेक आजारांवर या वाईनने उपचार केले जातात, असे सांगितले जाते. पारंपारिक औषधांमध्ये ते टॉनिक म्हणून वापरले जाते. चीन, जपान, कंबोडिया, कोरिया, लाओस, तैवान, व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये Snake Wine तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर मिळेल.

पिणे सुरक्षित आहे का?

स्नेक वाईनमध्ये वेदनाशामक म्हणजे वेदना कमी करणारे आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म आहेत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ते पिणे सुरक्षित आहे का? तर उत्तर ‘नाही’ आहे. राईस वाईनमध्ये इथेनॉलचाही वापर केला जातो, त्यामुळे सापाचे विष संपते. साधारणपणे ते बनवण्यासाठी जास्त विषारी साप वापरले जात नाहीत. मात्र, ही वाइन पिणे धोकादायक ठरू शकते, असा इशाराही या वाइनवर देण्यात आला आहे.