पृथ्वीवर धडकणार सौर वादळ!! संपूर्ण जगासाठी हाय अलर्ट जारी; Mobile वर परिणाम होणार?

टाइम्स मराठी । नॅशनल ओशनिक अँड एटमॉस्पेरिक ऍडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने एक दावा केला आहे. या दाव्यात त्यांनी सूर्याच्या पृष्ठभागावर एक अतिशय घातक वादळ येणार असल्याचे सांगितलं. आणि हे वादळ पृथ्वीच्या दिशेने सरकत असून त्याचा अत्यंत घातक परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर हे वादळ 19 जुलै रोजी पृथ्वीवर येईल असं देखील सांगण्यात येत आहे. परंतु हे वादळ पृथ्वीसाठी किती प्रमाणात घातक असेल हे सांगण्यात आलेलं नाही.

   

स्पेस वेदर डॉट कॉम यांच्या मते, हे वादळ आतापर्यंतच्या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी असू शकते. त्याचबरोबर कोरोनाल मास इंजेक्शन (CME) पृथ्वी च्या चुंबकीय क्षेत्राला स्पर्श करेल. सूर्याच्या सनस्पॉटच्या (AR3363) चुंबकीय छत्रीमध्ये कालच्या शक्तिशाली M6 श्रेणीच्या विस्फोटातुन आला आहे. त्याचबरोबर भू – चुंबकीय तुफान G3 श्रेणीच्या तीव्रतेपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढंच नाही तर हे वादळ यापूर्वी देखील आलेलं आहे. परंतु यंदा पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती असू शकते असं सांगण्यात येत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये हे भूचुंबकीय G3 श्रेणीच्या तीव्रतेचे वादळ आले होते. यामुळे पर्यावरणातील स्थिर विजेचे प्रमाण वाढले होते.

हे वादळ कॅनडामध्ये आल्यामुळे तेथील तेलाची गळती सुरू झाली होती. आणि स्पेस एक्सचे रॉकेट लॉंचिंग देखील यामुळे पुढे ढकलण्यात आले होते. शास्त्रज्ञांच्या मते, हे सौरवादळ लहान उपग्रहांना नुकसान पोहोचवू शकते. एवढेच नाही तर या वादळामुळे मोबाईल जीपीएस नेटवर्कवरही परिणाम पडू शकतो. त्याचबरोबर वाढत्या चुंबकीय क्षमतेमुळे पृथ्वीवरील पॉवर ग्रीडवरही याचा परिणाम दिसून येईल.