किचनमधील झुरळांनी तुम्हीही त्रस्त आहात? हे 7 उपाय ठरतील तुमच्या फायद्याचे

टाइम्स मराठी । गृहिणी किचनमध्ये होणाऱ्या झुरळांच्या समस्येमुळे नेहमीच त्रस्त असतात. किचनची कितीही साफसफाई करून देखील झुरळ होतात. किचन मध्ये दुर्गंध, घाण किंवा उष्टे अन्न ताटामध्ये तसेच रात्रभर पडून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात झुरळांची वाढ होत असते. आणि यामुळे झुरळ ताटावर आणि प्रत्येक ठिकाणी किचनमध्ये फिरत असतात. त्यामुळे घरातील गृहिणींना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही झुरळांना पळवून लावू शकता.

   

1) तेजपत्ता –

तेज पत्त्याचा गंध हा झुरळांना आणि किडयांना आवडत नाही. त्यामुळे या तेजपत्याच्या वासामुळे ते दूर जातात. अशावेळी तुम्ही झुरळ आणि कीटकांना घरातून पळवून लावण्यासाठी तेजपत्ते कपाटात ड्रॉवर पॅन्ट्री मध्ये ठेवू शकतात. यामुळे तुमच्या घरात झुरळ राहणार नाहीत.

2) बेकिंग सोडा-

बेकिंग सोडा देखील झुरळांना लांब पळवण्यासाठी उपयोगी येतो. त्यासाठी बेकिंग सोडा आणि साखर दोन्ही समान पद्धतीने मिक्स करा. झुरळांना साखर आकर्षित करत असते. परंतु बेकिंग सोडा झुरळांची पचन प्रक्रिया बिघडवतो. यानुसार साखरे जवळ झुरळ आल्यास बेकिंग सोडा मुळे किचन मधून नाहीसे होतील.

3) लसूण –

लसूणचा वास देखील झुरळांना आणि किड्यांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात येतात त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या किंवा ठेचलेला लसूण ठेवू शकतात. जेणेकरून झुरळ या घरातून लांब जातील. आणि गृहिणींची झुरळापासून सुटका होईल.

4) व्हिनेगर –

व्हिनेगर चा येणारा दाट सुगंध झुरळांना हाकलून लावण्यास मदत करू शकतो. व्हिनेगर झुरळांना पळून लावण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पांढरे विनेगर आणि पाणी या दोघांचे मिश्रण तयार करा. त्यानंतर या मिश्रणाचा उपयोग फरशी पुसण्यासाठी करा. यासोबतच किचनमध्ये याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

5) लिंबू –

पृष्ठभागावर लिंबू टाकून साफ केल्यास लिंबूच्या वासामुळे झुरळ येणार नाही. यासोबतच लिंबूचे साल देखील तुम्ही कानाकोपऱ्यात, कपाटात, ड्रॉवर मध्ये ठेवू शकतात. यामुळे तुमच्या घरातून झुरळ नाहीसे होतील.

6) इसेन्शियल ऑइल-

निलगिरी, पेपरमिंट, लव्हेंडर यासारखे इसेन्शियल ऑइल झुरळांना दूर पळवू शकतात. यासाठी पाण्यामध्ये काही या इसेन्शियल ओईलचे थेंब टाकल्यानंतर एक स्प्रे तयार करा. आणि ज्या ठिकाणी झुरळा येतात त्या ठिकाणी स्प्रे फवारा. जेणेकरून झुरळ पुन्हा येणार नाही.

7) दालचिनी –

मसाल्याच्या पदार्थांमध्ये असलेली दालचिनी देखील झुरळांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त आहे. कारण दालचिनीचा वास झुरळांना हाकलून लावतो. त्यामुळे तुम्ही दालचिनी किंवा दालचिनीची पावडर कपाट, किचन, ड्रॉवर, किचन बेसिन जवळ टाकू शकतात. ज्यामुळे दालचिनीच्या वासाने झुरळ परत येणार नाहीत.