Sonos ने लाँच केले 2 स्मार्ट स्पीकर; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Sonos कंपनीने दोन प्रीमियम स्मार्ट स्पीकर लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्ट स्पीकर मध्ये  युनिक फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्ट स्पीकरचं नाव Era 100 आणि Era 300 असं आहे. हे दोन्ही स्मार्ट स्पीकर्स कंपनीने ‘ साऊंड च्या नवीन युगासाठी’ डिझाईन केले आहेत. त्यानुसार जाणून घेऊया या स्पीकरची किंमत आणि फीचर्स.

   

Era 300 फीचर्स

Era 300 या स्पीकर मध्ये आवरग्लास डिझाईन उपलब्ध आहे. या डिझाईनमुळे स्पीकर मधून येणारा आवाज अप्रतिमरित्या ऐकू येतो. कंपनीने लॉन्च केलेले हे दोन स्मार्ट स्पीकर हे कंपनीचे पहिले स्मार्ट स्पीकर आहे. यामध्ये SPATIAL AUDIO, DOLBI ATMOS यासारखे वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहे. या स्मार्ट स्पीकर मध्ये चार ट्विटर्स, दोन वुफर्स  बी देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या स्पीकर मध्ये  SONOC Arc किंवा Beam वापरले जातात.या स्मार्ट स्पीकर मध्ये 6 पावरफुल ऑडिओ ड्रायव्हर्स उपलब्ध असून त्याच्या माध्यमातून स्पीकर च्या बाहेर निघणारा आवाज चारही दिशांनी प्रोजेक्ट होतो.

Era 100 फिचर्स

Era 100 यामध्ये  नेक्स्ट जनरेशन ऑकॉस्ट्रिक,  क्रिस्प, डीपर बेस प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये दोन ट्विटर्स, सिंगल वुफर  उपलब्ध करण्यात आले आहेत. या स्मार्ट स्पीकर मध्ये  कंपनीने  trueplay टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे. जेणेकरून अप्रतिम ऑडिओ मिळतो.SONOS कंपनीचे हे स्मार्ट स्पीकर्स  साऊंड प्रोफाइल ला  हव्या त्या पद्धतीने बदलू शकतात.

कनेक्टिव्हिटी

या दोन्ही स्मार्ट स्वीकारला कनेक्ट करण्यासाठी वाय-फाय आणि ब्लूटूथ हे ऑप्शन उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये बॉईज असिस्टंट फीचर देखील उपलब्ध आहे. त्यानुसार युजर्स वोईस कमांड देऊन  स्मार्ट स्पीकर ऑपरेट करू शकतात. Sonos कंपनीचे दोन्ही स्मार्ट स्पीकर बऱ्याच पद्धतीने कस्टमायझेशन फिचर्स मध्ये उपलब्ध आहेत.

किंमत किती

Sonos कंपनीचे हे दोन्ही स्मार्ट स्पीकर्स वेगवेगळ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही SONOS ERA 100 हा स्मार्ट स्पीकर 29,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. आणि SONOS ERA 300 हा स्मार्ट स्पीकर 54,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.