Sony ने लाँच केले 2 नवे Camera; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । जापानी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाणारी Sony कॉर्पोरेशन ही कंपनी भारतामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च असते. SONY कंपनीचा कॅमेरा हा मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून पसंत केला जातो. आता सोनी कंपनीने हाय एंड  APC C मिररलेस कॅमेरा, &alpha 6700 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे.  यामध्ये कंपनीने इमेज स्टॅबिलायझेशन आणि स्टील,  व्हिडिओ फीचर्स उपलब्ध केले आहे. या कॅमेरा मध्ये देण्यात आलेले सेंसर  सर्वसाधारण इमेज क्वालिटी प्रोव्हाइड करणे हे लक्ष्य साध्य करते. जाणून घेऊया या कॅमेराचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

प्रोसेसर

SONY a6700 म्हणजेच Sony alpha 6700 या कॅमेरा मध्ये 26 MP BSI CMOS APS C सेन्सर देण्यात आले आहे. हे सेंसर असाधारण इमेज कॉलिटी प्रोव्हाइड करते. हा कॅमेरा बायोनज XR प्रोसेसर आणि AI प्रोसेसिंग इंजिन ने सुसज्ज आहे. हा कॅमेरा बेस्ट इमेज  प्रोवाईड करण्यास सक्षम आहे. हा कॅमेरा अपलोड करण्यासाठी  LUTS सपोर्ट देण्यात आला आहे. जेणेकरून युजर्स ला फुटेज अनुकूलित ठेवण्यासाठी मदत होते.

फिचर्स

SONY alpha 6700 या कॅमेरा मध्ये हाय इमेज कॉलिटी ला सिक्युअर करण्यासाठी RAW ऑप्शन देण्यात आले आहे. यासोबतच कॅमेरा मध्ये  HEIF आणि HLG स्टील इमेज मोड देण्यात आले आहे. या मोडच्या माध्यमातून युजर्स ला स्टील फोटोग्राफी साठी क्रिएटिव्ह ऑप्शन मिळेल. या कॅमेरा मध्ये  कंपनीने  AF ट्रॅकिंग फीचर्स उपलब्ध केले आहे. हे फीचर्स विश्वासनीय फोकसिंग साठी  93% फ्रेम कव्हर करणाऱ्या 759 AF पॉईंट प्रोव्हाइड करतात.

कॅमेरा

SONY alpha 6700 कॅमेरा 6K कॅप्चरने 60p पर्यंत 4K व्हिडिओ आणि 120x क्रॉप सोबतच  4K 1.58 ला सपोर्ट करतो. जे हाय कॉलिटी वाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर कॅमेरा 4:2:2 आणि 4:2:0 कलर सॅम्पलिंग  ऑप्शनसह 10 बिट व्हिडिओ प्रदान करतो. जेणेकरून समृद्ध आणि अचूक कलर मिळेल. हा कॅमेरा S cinatone, S log 3, HLG प्रोफाईल मध्ये उपलब्ध आहे. जेणेकरून युजर्स ला व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्जनशील अभिव्यक्ती एक्सप्लोर करण्यास परवानगी मिळते.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

SONY alpha 6700 यामध्ये फास्ट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आणि अप्रतिम वर्क फ्लोसाठी  USB 3.2 Gen 2 (10Gbps) मिळतो. यासोबतच विश्वासनीय आणि हाय स्पीड वायरलेस कनेक्शन साठी 2×2 MIMO वायफाय  उपलब्ध आहे. या कॅमेरा मध्ये  UVC /UAC स्ट्रीमिंग  देण्यात आली आहे ज्यामुळे लाईव्ह कंटेंट शेअर करण्यास मदत होईल.

किंमत किती

SONY a6700 म्हणजेच Sony alpha 6700 हा कॅमेरा तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर, सोनी कॅमेरा लाऊंज, सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप स्टोअर्स, सोनी अधिकृत डीलर्स, अमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आणि खास इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स वरून खरेदी करू शकतात. Sony कंपनीच्या  ILCE 6700 बॉडी ची किंमत 136,990  रुपये एवढी आहे. आणि ILCE 6700L (Body + 16-50mm Power Zoom Lens ) ची किंमत 172,990 रुपये आहे.