Spam Calls Block : तुम्हालाही Spam Calls येतायंत? फक्त मोबाईल मधील हे सेटिंग बदला

Spam Calls Block । दैनंदिन जीवनामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढला असून आजकाल मोबाईल शिवाय कोणतेच काम होऊ शकत नाही. प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनची गरज पडते. याशिवाय आजकाल सर्वच ऑफिशियल, पर्सनल, बँक रिलेटेड कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून होत असल्यामुळे मोबाईल गरजेचा झालेला आहे.  ज्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाली, त्याचप्रमाणे सायबर क्राईम चे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागले. आणि यासोबतच मोबाईलवर अनावश्यक स्पॅम कॉलिंग देखील वाढत आहेत. या कॉलिंग च्या माध्यमातून बरेच व्यक्ती सायबर क्राईमच्या जाळ्यामध्ये देखील फसलेले आपण पाहतोय.

   

बऱ्याचदा मीटिंगमध्ये असल्यावर गरज नसलेले कॉल येतात. बरेच व्यक्ती हे स्पॅम कॉल रोखण्यासाठी किंवा त्यापासून  सुटका मिळवण्यासाठी मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतात. परंतु त्यानंतर वेगवेगळ्या नंबर वरून कॉल येण्यास सुरुवात होते.  स्मार्टफोनवर येणारे हे स्पॅम कॉल थांबवण्यासाठी प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये  एक सेटिंग दिली जाते. या सेटिंग च्या माध्यमातून स्पॅम कॉल येणे थांबू (Spam Calls Block) शकते. त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग करावी लागेल. जेणेकरून तुम्ही या स्पॅम कॉल पासून वाचू शकाल.

या सेटिंगच्या माध्यमातून स्पॅम कॉल पासून मिळवा सुटका- Spam Calls Block

1) सर्वात आधी गुगल डायलर वर जा. त्यानंतर ऐपल ओपन करा.
2) नंतर तुम्हाला टॉप राईट कॉर्नर वर तीन डॉट दिसतील. या डॉट वर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर बरेच ऑप्शन उपलब्ध होतील.
4) सेटिंग मध्ये गेल्यानंतर  कॉल सेटिंग मध्ये जा.
5) त्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स सेटिंग दिसेल. त्यावर क्लिक करा.
6)  तुम्हाला कॉलर आयडी आणि स्पॅम Caller ID And Spam हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर  तुम्हाला sea caller and sperm ID आणि filter spam calls  हे ऑप्शन मिळेल.
7) तुम्हाला दोन्ही ऑप्शन मध्ये जाऊन टॉगल ऍक्टिव्ह करावे लागेल.
8) त्यानंतर तुम्हाला फिल्टर कॉल सोबतच प्रेफरेन्स ऑप्शन मिळेल.
9) त्यानंतर तुम्ही येणारे सर्वच स्पॅम कॉल्स ब्लॉक करू शकता.