आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी येणार विशेष कायदा

टाइम्स मराठी । कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या संदर्भात सरकारकडून करण्यात आलेल्या कायद्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर याठिकाणी असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी खास कायदा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आलेली आहे. याबाबत विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडताळणी सुरू असल्याची माहिती दिली.

   

विधानपरिषदेचे सदस्य आणि भाजप आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी काही मुद्दे मांडले होते. यावर प्रतिउत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे श्री संत बाळूमामा यांचे मोठ्याप्रमाणात भाविक आहे. या भाविकांसाठी सोयीसुविधा आणि श्री संत बाळूमामा देवस्थानाच्या न्यासात सदस्य म्हणून राज्यभरातील भक्तगणांच्या समूहातील प्रतिनिधित्वासाठी देखील काही विचार केले जातील.

श्री संत बाळूमामा देवस्थानाकडून आलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. याबाबत ट्विटरवर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये #विधानपरिषद लक्षवेधी असा हॅशटॅग देण्यात आला आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये कोल्हापूर जिल्हामधील आदमापुर या ठिकाणी श्री संत बाळूमामा देवस्थानाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने दप्तर हस्तांतर करण्याची सूचना देण्यात येऊन या देवस्थानाबाबत वेगळा कायदा करण्यासंदर्भात धर्मदाय आयुक्तांचा अभिप्राय मागवण्यात येणार अशी माहिती दिली आहे.

आदमापूर येथे बाळुमामाच्या दर्शनाला महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. बाळूमामा हे जागृत आणि देवस्थान आणि श्रद्धास्थान मानलं जाते. सध्या या मंदिराचे व्यवस्थान कोल्हापूर येथील धर्मादाय उपायुक्तांकडे नोंदणी असलेल्या समितीकडे आहे. याच समितीच्या भ्रष्ट कारभारावरून गोपीचंद पडळकर यांनी तक्रार केली होती