स्वतःला Spiderman म्हणत विद्यार्थ्याने बिल्डिंग वरून मारली उडी अन पुढे घडलं असं काही (Video)

टाइम्स मराठी । लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम आणि प्रभाव लवकर पडत असतो. लहान मुलांना कार्टून पाहणे हे जिवापेक्षा जास्त आवडत असतं. बऱ्याचदा घरामध्ये असताना मस्तीच्या नादात ते त्यांना आवडत असलेल्या कार्टूनची नक्कल करतात. परंतु ते खरं मध्ये नसून खोटं आहे हे त्यांना माहिती नसतं. अशाच प्रकारची एक घटना कानपूर मध्ये घडली आहे. या ठिकाणी मी स्पायडरमॅन आहे म्हणत एका लहान मुलाने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

   

कानपूर येथील किदवई नगर मध्ये असलेल्या वीरेंद्र स्वरूप एज्युकेशन सेंटर मध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी बुधवारी तिसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मी स्पायडरमॅन असं म्हणत शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. पहिल्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर हा विद्यार्थी थरथरताना दिसला. ही घटना घडण्यापूर्वी स्कूल मधल्या मुलांमध्ये स्पायडरमॅन बद्दल गप्पा रंगल्या होत्या. स्पायडरमॅन एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये एका मिनिटात उडी मारून पोहोचतो. त्याला कोणीही पकडू शकत नाही. या गप्पा सुरू असताना पहिल्या मजल्यावरून 16 फूट वरून उडी मारण्याची शर्त त्यांच्यात लागली. आणि तिसरी मधल्या एका विद्यार्थ्याने मी आहे स्पायडरमॅन म्हणत उडी मारली. सध्या त्याची तब्बेत ठीक असून त्याला रुग्णालयात भरती केलं आहे.

हा तिसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचे नाव विराट बाजपेयी आहे. हा मेडिकल स्टोअर संचालक आनंद बाजपेयींचा 8 वर्षाचा मुलगा असून बाबूपूरवा एनएलसी कॉलनी मध्ये राहतो. 19 जुलैला मुलगा शाळेत गेला होता आणि त्याच वेळी शाळेमध्ये मुलांमध्ये स्पायडरमॅन बद्दल चर्चा सुरू होती असं आनंद बाजपेयी यांनी सांगितलं. ही संपूर्ण घटना दुपारी 1.30 मिनिटांनी घडली. आणि विद्यार्थ्यांच्या आईला फोन करून घडलेला प्रकार सांगण्यात आला.

या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी मीडियाला सांगितलं की, स्कूल मध्ये मिळालेल्या माहितीनुसार शाळेची सुट्टी होण्यापूर्वीच विराट पाणीची बॉटल भरण्यासाठी परमिशन घेऊन बाहेर गेला होता. क्लासच्या बाहेर असलेलं थंड पाणी भरत असताना त्याचे तीन मित्र त्या ठिकाणी आले आणि त्यांनी स्पायडरमॅन प्रमाणे उडी मारण्याची शर्त लावली. त्यामुळे त्याने पहिला मजल्यावरून उडी मारली. घडलेल्या घटनेमुळे शाळेच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसून विद्यार्थ्याच्या आईने विद्यार्थ्यांची चूक असल्याचं सांगितलं आहे.