टाइम्स मराठी । एकदाची दुचाकी चालू करायची असेल तर किक किंवा स्टार्टरची गरज लागते हे तुम्हाला माहित आहेच, परंतु किक आणि स्टार्टर शिवाय सुद्धा तुम्ही तुमची गाडी चालू करू शकता असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर?? नक्कीच तुमचा विश्वास बसत नाही ना? पण हे शक्य आहे. जर सेल्फ-स्टार्ट काही कारणास्तव काम करत नसेल तर बाईक कशी सुरु करायची याची एक सोप्पी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय आहे ट्रिक-
जर तुम्ही सेल्फी स्टार्टर आणि किक न वापरता तुमची बाईक सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्ही सर्वात आधी तुमची मोटरसायकल डबल स्टँडवर उभी करा. असे केल्याने तुम्हाला जमिनीवर चांगली पकड मिळते. यानंतर तुमची मोटरसायकल टॉप गिअरमध्ये ठेवा. हा या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. एकदा का तुम्ही असं केलं कि मग तुम्हाला बाईकच्या मागच्या टायरमध्ये जाऊन पुढच्या बाजूला फिरवावा लागेल. तुम्हाला बाइकचा टायर पुढे वेगाने फिरवायला किती वेळ लागतोहे व्यवस्थित चेक करा. एकदा समजले की मग तुम्हाला बाइकचा टायर वेगाने पुढे फिरवावा लागतो. ती पुढे वळताच तुम्हाला बाईक स्टार्ट झाल्याचे दिसेल. असे अनेक वेळा करून तुम्ही बाइक सुरू करू शकता. ही पद्धत खूप उपयुक्त असून इमर्जंसी परिस्थितीत तुम्हाला उपयोगी पडू शकते.
आपल्यातील अनेक जणांना या ट्रिक बद्दल माहिती नसेल किंवा अनेकांनी ती वापरली सुद्धा नसेल. परंतु जर तुम्ही अशा ठिकाणी अडकलात जिथे तुम्हाला मदत मिळू शकत नाही आणि बाईक सुरू होत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. अतिशय सोप्पी आणि कोणतत्याही खर्चात न पडता गाडी सुरु करण्याची ट्रेक नक्कीच अडचणीच्या काळात तुमच्या कामी येईल.