आता Gmail च्या मदतीने सुरु करता येणार Whatsapp; कंपनी आणतंय खास फीचर्स

टाइम्स मराठी । Whatsapp व्हाट्सअप हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखले जाते. Whatsapp मध्ये मेटा कंपनीने वेगवेगळे फीचर्स ऍड केले असून या फिचरच्या माध्यमातून Whatsapp वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे.  Whatsapp मध्ये व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग,  चॅनेल फीचर, HD फोटो क्वालिटी  यासारखे बरेच फीचर्स  कंपनीने लॉन्च केले आहे. या फीचर्समुळे Whatsapp हे पूर्णपणे बदलले आहे. या Whatsapp मध्ये आणखीन बरेच फीचर्स ऍड करण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या ई मेल अकाउंटच्या माध्यमातून Whatsapp सुरु करू शकतात.
काय आहे हे फीचर

   

प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटी साठी Whatsapp मध्ये हे एक नवीन फीचर उपलब्ध करण्यात येत आहे. हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स आणि ios यूजर साठी उपलब्ध असेल. त्यानुसार आता व्हाट्सअप अकाउंट ओपन करण्यासाठी मोबाईल नंबरची गरज पडणार नाही. आता ईमेल आयडी च्या माध्यमातून  व्हाट्सअप अकाउंट ओपन करणे सोपे होईल. त्यासाठी युजर्सला व्हाट्सअप जीमेल अकाउंटला व्हेरिफाय करावे लागेल.

अशा पद्धतीने होईल Gmail व्हेरिफाय

व्हाट्सअप च्या या नवीन फीचर्स बद्दल WABETAINFO या कंपनीने माहिती शेअर केली. सध्या हे फीचर काही बीटा युझर्स साठी रोलआउट करण्यात आले आहे. या फीचर च्या माध्यमातून मोबाईल नंबर शिवाय व्हाट्सअप अकाउंट ओपन करता येईल. म्हणजे व्हाट्सअप साठी आता मोबाईल नंबरची गरज भासणार नाही. व्हाट्सअप लॉगिन करण्यासाठी तुम्हाला जीमेल अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Gmail वर एक OTP येईल. या OTP च्या माध्यमातून तुम्ही Whatsapp वर Gmail च्या माध्यमातून अकाउंट ओपन करू शकता किंवा एक्सेस मिळवू शकता.