stryder कंपनीने लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक सायकल; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टाइम्स मराठी | टाटा इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या मालकीची कंपनी stryder ने नवीन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलच नाव Contino असं आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या Contino Galactic या इलेक्ट्रिक सायकलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतातील ही पहिली अशी सायकल आहे, ज्यामध्ये मॅग्नेशियम फ्रेम वापरण्यात आली आहे. कंपनीने या सीरिजमध्ये 8 मॉडेल्स लॉन्च केले असून काही शहरांसाठी स्पेशली सिटी बाईक देखील लाँच केली आहे. आता जाणून घेऊया या सायकलसारख्या दिसणाऱ्या इलेक्ट्रिक बाइकची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

   

Contino Features

Contino Galactic 27.5T या इलेक्ट्रिक सायकल मध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल डिस ब्रेक्स स्मूथ शिफ्टिंगसाठी फ्रंट आणि रियर डेरइलेयर्स, लॉक इन/आउट टेक्नोलॉजी, फ्रंट सस्पेंशन यासोबतच वेगवेगळ्या शहरांसाठी 21 तरह स्पीड ऑप्शन देखील देण्यात आले आहेत. यात माउंटेन बाइक्स, फैट बाइक्स, बीएमएक्स बाइक्स आणि हाई परफॉरमेंस सिटी बाइक्स यांचा देखील समावेश होतो. सर्व इलेक्ट्रिक सायकल्समध्ये ॲल्युमिनियम फ्रेम्स वापरले जातात. परंतु या इलेक्ट्रिक सायकलमध्ये मॅग्नेशियम फ्रेम वापरण्यात आली आहे . मॅग्नेशियम फ्रेम ॲल्युमिनियम फ्रेमच्या तुलनेत मजबूत असतात. ज्यामुळे सायकला ऑफ रोड शानदार डिझाईन मिळते. यासोबतच यात व्हायब्रेशन सहन करण्याची क्षमता देखील प्रचंड आहे.

Price

Contino Galactic 27.5T या इलेक्ट्रिक सायकलला कंपनीने ऑफिशियल वेबसाईटवर लिस्ट केले असून या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 27,896 रुपये आहे. यामध्ये दोन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे मिल्ट्री ग्रीन आणि दुसरा म्हणजे ग्रे. तुम्ही जर ही इलेक्ट्रिक सायकल खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही या कंपनीच्या ऑफिशियल साईटवरून किंवा डीलरशिपच्या माध्यमातून देखील खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर, ई कॉमर्स वेबसाईट प्लॅटफॉर्मवर देखील ही उपलब्ध आहे. Contino कंपनीची इलेक्ट्रिक सायकल वेगवेगळ्या कलर ऑप्शन आणि साईजच्या माध्यमातून खरेदी करता येऊ शकते. त्यासाठी वेगवेगळ्या किमतींमध्ये या सायकल उपलब्ध आहेत. Contino इलेक्ट्रिक सायकलची किंमत 19526 रुपयांपासून सुरू होते.