‘सुभेदार’ची रेकॉर्डब्रेक कमाई; 4 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

टाइम्स मराठी । 25 ऑगस्ट रोजी सुभेदार हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता चार दिवसातच सुभेदारने बॉक्स ऑफिसवर सुमारे 5.86 कोटी रुपयांची कमाई केली. सुभेदार चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी चित्रपट रिलीज पूर्वीच डोक्यावर घेतले होते. आता सिनेमागृहामध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला असून चित्रपटासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे.

   

हे आहे प्रमुख भूमिकेत

दिग्पाल लांजेकर यांचा शिवराज अष्टक या पंक्तीतील सुभेदार हा पाचवा सिनेमा आहे. यामधील शीर्षक भूमिका ही अजय पुरकर साकारत असून स्मिता शेवाळे, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसतील. यासोबतच चिन्मय मांडलेकर, मुनाल कुलकर्णी, अजय पुरकर या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका असणारा सुभेदार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे.

सोमवारी देखील मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

Sacnilk या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुभेदार या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून चार दिवसांमध्ये 5.63 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या तुलनेमध्ये शनिवार आणि रविवार असल्याकारणाने तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई प्रचंड वाढली आहे. मंगळवारी 29 ऑगस्टला सुभेदार चित्रपटाच्या सकाळच्या शोला 11.79% ऑक्युपन्सी मिळाली. त्यामुळे पाचव्या दिवशी या चित्रपटाने 1.05 कोटींची कमाई केली असल्याचा अंदाज आहे. यानुसार हा आगळा 6.85 कोटी पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चार दिवसांची एकूण आकडेवारी

पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेमध्ये तिसऱ्या दिवशी रविवार असल्या कारणाने सुभेदार चित्रपटाच्या कमाई मध्ये वाढ झाली. रविवारी तिसऱ्या दिवशी 2.22 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. यानुसारच 25 ऑगस्टला पहिल्याच दिवशी सुभेदार चित्रपटाची कमाई 1.15 कोटी रुपये एवढी होती. त्यानंतर सुभेदार रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्टला ही कमाई 1.69 कोटी, 27 ऑगस्टला रविवार असल्या कारणाने 2.22 कोटी आणि सोमवार असून सुद्धा 28 ऑगस्टला 00.080 कोटी रुपये एवढी कमाई चित्रपटाने केली. म्हणजे एकूण चार दिवसांची कमाई 5.86 कोटी रुपये एवढी झाली.