यशस्वी होण्यासाठी ‘या’ 5 पक्षांपासून सक्सेस मंत्र शिका

टाइम्स मराठी । जीवनात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य सतत मार्गदर्शन करत असतात. आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति किंवा नीतीशास्त्र हे संग्रह आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी मार्ग  दाखवतात. जेणेकरून येणाऱ्या काळात संकटांचा सामना व्यक्ती करू शकेल. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटांना मात करत यश मिळवले आहे. त्यानुसार चाणक्य यांनी त्यांच्या अनुभवातून या संग्रहाचे लिखाण केले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. या अडचणींना घाबरून न जाता त्यावर मात केली पाहिजे. जेणेकरून आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकेल.

   

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती अडचणींचा  पूर्णपणे न घाबरता सामना करतो तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणते न कोणते अडचणी येत असतात. परंतु त्यांना त्या अडचणींचा सामना करत, यशस्वी होण्यासाठी संघर्ष करत पुढे जावे लागते. आज आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी 5 सक्सेस मंत्र सांगितले आहे, जे आपण पक्षांपासून शिकले पाहिजे. जाणून घेऊया कोणते आहेत हे पक्षी …

१) बगळा

आचार्य चाणक्य नुसार, यश मिळवण्यासाठी स्वतःवर संयम असणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने बगळा या पक्षापासून सर्व इंद्रियांवर कंट्रोल ठेवणे शिकले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती त्यांच्या मनावर सदैव  कंट्रोल ठेवू शकेल आणि  शांती सोबतच ध्येय गाठू शकेल.  बगळा या पक्षाची  खासियत म्हणजे, हा पक्षी सर्व इंद्रियांवर कंट्रोल ठेवतो. त्यामुळे बगळ्या पासून ही गोष्ट शिकणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून  एकाग्रतेने  आपले लक्ष्य साध्य करता येईल. यासोबतच  मन विचलित होणार नाही.

२) कोकिळा

कोकिळा ही मधुर वाणी साठी प्रसिद्ध आहे. कोकिळेच्या आवाजानेच तिची ओळख होते. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने मधुर बोलले पाहिजे. जेणेकरून  मधुर वाणीने समोरच्या व्यक्तीला जिंकता येईल. आणि प्रत्येक व्यक्ती मधुर वाणीने अडकलेले कामे पूर्ण करू शकतील. आचार्य चाणक्य सांगतात की, कठोर बोली पेक्षा मधुर बोलल्यामुळे जे काम पेंडिंग आहे ते लवकर होऊ शकते. त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती इतरांबद्दल चांगले बोलू शकत नसेल तर वाईटही बोलू नये. ज्या व्यक्तींची वाणी मधुर असते त्या व्यक्तींकडे प्रत्येक व्यक्ती आकर्षित होतो. आणि भविष्यात यश मिळवण्यासाठी कोणत्या अडचणी येत नाही.

३) कोंबडा

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने कोंबड्या प्रमाणेच दिवसाची सुरुवात लवकर केली पाहिजे. कोंबड्याचा हा गुण अत्यंत महत्त्वाचा असून संघर्षांचा सामना करणे देखील कोंबड्या पासून शिकले पाहिजे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून आयुष्यात यश मिळवता येईल.

४) कावळा

कावळा हा पक्षी स्वतःचे आणि त्याच्या पिल्लाचे अन्न एकटा जमवतो. कावळा हा पक्षी कधीच आळस करत नाही. आणि इतरांवर विश्वास देखील ठेवत नाही. प्रत्येक व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी कावळ्याचे हे तिन्ही गुण घेणे गरजेचे आहे. आयुष्यामध्ये ध्येय गाठत असताना प्रत्येक व्यक्तीने सावध राहणे गरजेचे आहे. यासोबतच  इतरांवर डिपेंडेड राहणे किंवा इतरांवर लवकर विश्वास ठेवणे देखील टाळले पाहिजे. आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने आळस सोडून  ध्येय गाठण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

५) कुत्रा

कुत्रा या प्राण्याला इमानदार मानले जाते. आचार्य चाणक्य सांगतात, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात यश मिळवण्यासाठी  कुत्र्याप्रमाणे सतर्क राहिले पाहिजे. जेणेकरून ध्येय गाठण्यावेळी कोणत्याही अडचणी उद्भवणार नाही. तुम्ही पाहिले असेल  कुत्रा या प्राण्याला बऱ्याचदा झोप येते. परंतु कोणाच्याही हालचालींमुळे कुत्रा प्राणी लगेच उठून जातो. त्याचप्रमाणे व्यक्तीने  कोणत्याही परिस्थितीमध्ये सतर्क राहायला पाहिजे. कुत्र्याचा हा गुण प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणणे गरजेचे आहे.