गाडीमध्ये गॉगल ठेवण्याने जाऊ शकतो जीव!!! तुम्हीसुद्धा सनग्लासेस वापरत असाल तर ‘हे’ नक्की वाचा

टाइम्स मराठी टीम । सध्या उन्हाळा असल्यामुळे आपण स्वतःची, चेहऱ्याची काळजी म्हणून उन्हापासून संरक्षण करणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा वापर करतो. त्यामध्ये सनग्लासेस हे एक आहेत. कुठेही बाहेर जाताना आपण सनग्लासेस लावून बाहेर पडतो. जगातील देशांमध्येच नाही तर भारतात देखील लोक उष्णतेमुळे हैराण झालेले आहे. त्यामुळे सर्वजण बाहेर जाताना सनग्लासेस वापरणं योग्य समजतात. परंतु जर तुम्ही एसी कार मधून प्रवास करत असाल आणि कार मधून बाहेर पडताना सनग्लासेस गाडीतच ठेवत असाल तर हे धोकादायक असू शकते.

   

तज्ज्ञांच्या मते , तुम्ही सनग्लासेस गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवत असाल तर हे खूप धोकादायक असू शकते. या चुकीमुळे कारमध्ये स्फोट होऊन तुमच्या कारला आग लागू शकते. अलीकडेच, यूकेच्या नॉटिंगहॅमशायर फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसने कारला लागलेली आग विझवली. या संपूर्ण घटनेची चौकशी केली असता, गाडीत ठेवलेल्या सनग्लासेसमुळे आग लागल्याचे कारण उघड झाले.

आपण लहानपणी कागद उन्हात धरून ठेवायचो आणि त्यावर भिंग धरले कि कागद पेट घेत होता त्याचप्रमाणे सनग्लासेसमध्ये एक भिंग आहे. जेव्हा ही काच उन्हात धरली जाते तेव्हा ते भिंग पुन्हा कारच्या काचेवर फेकते. त्यामुळे कारच्या काचा फुटून स्फोट होऊ शकतो. त्यामुळे कार मध्ये सनग्लासेस ठेवण्याची सवय महागात पडू शकते.

ही चूक करू नका

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये एका उभ्या असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला. त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान त्याठिकाणी गेल्यावर समजलं कि वाहनाचे स्टेअरिंग बिघडले असून त्याच्या विंडो स्क्रीनला मोठे छिद्र असल्याचे दिसून आले. आतमध्ये ठेवलेल्या सनग्लासेसमुळे हा प्रकार घडल्याचे त्यावेळी सिद्ध झाले. गाडीच्या आत येणारा सूर्यप्रकाश चष्म्यातून परावर्तित होऊन पुन्हा विंडोस्क्रीनवर पडत होता. बराच वेळ या प्रतिबिंबामुळे काचेत स्फोट झाला.

त्यामुळे सोशल मीडियावर लोकांना असे न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्णता सूर्यप्रकाशात खूप गरम होणारी कोणतीही गोष्ट गाडीच्या आत ठेवू नये. सनग्लासेसचे प्रतिबिंब कोणत्याही कागदावर पडले तर गाडीलाही आग लागू शकते.