Sunroof Cars : देशात सनरूफ गाड्यांची चलती; पण त्याचे दुष्परिणाम माहित आहेत का?

टाइम्स मराठी । कार खरेदी करत असताना ग्राहक सर्वात आधी कारमध्ये असलेल्या फीचर्सकडे लक्ष देतात. कारण हेच फीचर्स ग्राहकांना सर्वात जास्त आकर्षक करत असतात. सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये सनरूप असलेल्या कारची (Sunroof Cars) चलती मोठ्या प्रमाणात आहे. कार मध्ये असलेल्या सनरूप फीचरमुळे कार दिसायला खूप आकर्षक वाटते. परंतु सनरूप मुळे गाड्यांचे नुकसान देखील होत आहे . आज आम्ही तुम्हाला सनरूप फीचर असलेल्या कारमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल सांगणार आहोत.

   

उन्हात पार्क केल्यास काच तुटण्याची शक्यता

सनरूफ असलेलीली कार (Sunroof Cars) खरेदी करत असताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा विचार येतो की सनरूफ असल्यामुळे आपण कारच्या बाहेर निघू शकतो. परंतु हे सुरक्षित नसून त्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर, जर तुम्ही तुमची कार उन्हात पार्क केल्यास काच तुटण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे सनरूप असलेली कार सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे.

गर्मीचा सामना करावा लागतो Sunroof Cars

सनरूफ असलेल्या कार मध्ये मोठ्या प्रमाणात गर्मीचा सामना करावा लागतो. कारण उन्हामुळे कार तापते. आणि त्यामुळे प्रवास करत असलेल्या व्यक्तींना गर्मीचा सामना करावा लागतो. उन्हामुळे गाडीची काच मोठ्या प्रमाणात गरम होतो. यामुळे स्पीड मध्ये एसी लावावा लागतो. आणि त्यामुळे गाडीच्या मायलेजवर परिणाम होण्याची शक्यता असते.

फास्ट एसीमुळे जास्त इंधन लागते

सनरूप असलेल्या (Sunroof Cars) एसी कार मध्ये सर्वात जास्त इंधन भरावे लागते. हे इंधन सर्वसामान्य कार पेक्षा जास्त असते. एसी जास्त फास्ट गतीने सुरु केल्यामुळे कारचे इंधन मोठ्या प्रमाणात जळते. त्यामुळे साधारण कार पेक्षा जास्त इंधन या कारला गरजेचे आहे.

साफसफाई ची प्रचंड काळजी घ्यावी लागते

ज्या कारमध्ये सनरुप फीचर आहे त्या कारमध्ये साफसफाईची मोठ्या प्रमाणात गरज असते. सर्वसामान्य कार मध्ये जेवढी साफसफाई ची गरज नसते, त्यापेक्षा दुप्पट सनरुप फीचर असलेल्या कार मध्ये गरज पडते. सनरुप असल्यामुळे या कारमध्ये बऱ्याच ठिकाणी माती जमा होते. खास करून या कारमध्ये सनरुप ची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. बऱ्याचदा माती जमा झाल्यामुळे सनरूप जाम होऊन जातो. आणि सनरुप रिपेअर करण्यासाठी खूप खर्च आणि वेळही जातो.