Suzuki कंपनीची ‘ही’ स्कूटर देते 58 KM मायलेज; पहा किंमत किती

टाइम्स मराठी । सध्या भारतीय मार्केटमध्ये Suzuki कंपनीच्या Burgman Street 125 या स्कूटरची  मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही स्कूटर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पसंत येत असून तिचा लूक अतिशय डॅशिंग असा आहे. या स्कूटरचा लुक  ग्राहकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. या स्कूटरमध्ये कंपनीने सेंसर लावले आहे. हे सेंसर दोन्ही टायरला कंट्रोल करू शकतात. Suzuki ची ही स्कूटर हाय मायलेज देते. आज आपण या स्कुटरचे फीचर्स जाणून घेऊयात…

   

स्पेसिफिकेशन

Suzuki Burgman Street 125 या स्कूटरमध्ये 124cc हाय परफॉर्मन्स इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 780 MM पिक टॉर्क जनरेट करते. आणि 8.58 BHP पावर प्रदान करते.  कंपनीने या अत्याधुनिक स्कूटरमध्ये 5.5 लिटरचा फ्युएल टॅंक उपलब्ध केला आहे. तसेच यामध्ये स्टायलिश अलॉय व्हील वापरले आहेत. या स्कूटरच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं, ही स्कूटर 58 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते.

फिचर्स

या स्कूटरमध्ये एप्रन माऊंटेड हेडलाईट देण्यात आली आहे. या हेडलाईटमुळे स्कूटरचा लुक आणखीनच अट्रॅक्टिव दिसतो. या स्कूटरमध्ये कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. ज्यामुळे रायडरला एडिशन सेफ्टी मिळते. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये उपलब्ध असलेलया सेन्सरमुळे दोन्ही स्कूटरच्या टायरला कंट्रोल करण्यासाठी मदत होते. या स्कूटरमध्ये वाईड फुटबोर्ड, आरामदायक सिंगल सीट देण्यात आली आहे. सुझुकी कंपनीने ही सीट आरामदायी अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाईन केली आहे. त्यामुळे ही लांब आहे. या स्कूटरच्या फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक वापरण्यात आला आहे. ही स्कूटर 13 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये येते.

किंमत किती

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, BURGMAN STREET 125 ची एक्स शोरूम किंमत 95,802 रुपये आहे. बाजारात ही स्कुटर यामाहा फसिनो 125 आणि एप्रिलिया SXR 125 या गाडयांना टक्कर देईल.