Tablets Under 10000 : अवघ्या 10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हे ब्रँडेड टॅबलेट

Tablets Under 10000 : सध्या फेस्टिवल सिझन सुरू नसला तरीही ॲमेझॉनवर ब्रँडेड टॅबलेट वर मोठ्या प्रमाणात ऑफर सुरू आहेत. जर तुम्ही कमी किमतीमध्ये नवीन टॅबलेट खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला फक्त दहा हजार रुपयांमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे टॅबलेट सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतात. अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर हे टॅबलेट उपलब्ध आहेत. यामध्ये HONOR, LENOVO, Samsung यासारख्या कंपनीचे ब्रँड उपलब्ध असून EMI ऑप्शन देखील यासोबत उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात नेमकं कोणकोणते टॅबलेट तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

   

१) LENOVO TAB M9

LENOVO TAB M9 या टॅबलेट मध्ये मेटल बॉडी देण्यात आलेली असून ड्युअल टोन डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. या टॅबलेटमध्ये मीडियाटेक हिलिओ G80 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 12 वर आधारित आहे. त्याचबरोबर LENOVO च्या या टॅबलेटमध्ये 9 इंच एचडी एलसीडी टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 400 नीट्स पीक ब्राइटनेस देतो आणि 800 ते 1340 पिक्सल रिझोल्युशन देखील प्रदान करतो. यामध्ये आठ मेगापिक्सल रियर कॅमेरा, फ्रंट मध्ये दोन मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध आहे. या टॅबलेट मध्ये 5100 mAh बॅटरी देण्यात आलेली असून ही बॅटरी सिंगल चार्ज वर 13 तास चालू शकते. LENOVO TAB M9 या टॅबलेट मध्ये ॲमेझॉन वर 38 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार हा टॅबलेट फक्त 9999 मध्ये अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही हा टॅबलेट EMI वर घेऊन इच्छित असाल तर तुम्ही 485 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकतात.

२) HONOR Pad X8– Tablets Under 10000

HONOR Pad X8 या टॅबलेट मध्ये mediatek MT8786 8 कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 10.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1920×1200 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. या टॅबलेट मध्ये 51000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर 14 तासापर्यंत चालते. या टॅबलेटमध्ये फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेल आणि रियर कॅमेरा पाच मेगापिक्सेल देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. HONOR Pad X8 हा टॅबलेट तुम्ही अमेझॉन वरून 57% डिस्काउंट नुसार 8999 रुपयात मध्ये खरेदी करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही EMI या ऑप्शनचा देखील वापर करू शकतात. त्यानुसार तुम्ही 436 रुपयांमध्ये हा टॅबलेट घरी घेऊन जाऊ शकतात.

३) Samsung Galaxy Tab A 8.0 Wi-Fi + 4G

Samsung गॅलेक्सी टॅबलेट मध्ये 8.0 इंचाची मोठी स्क्रीन उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 1280 x 800 पिक्सल रिझोल्युशन प्रदान करतो. यासोबतच टॅबलेट मध्ये Qualcomm प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 5100mAh बॅटरी यामध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या टॅबलेट मध्ये सेल्फी साठी 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या टॅबलेट मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. तुम्ही हा टॅबलेट खरेदी करू इच्छित असाल तर अमेझॉनच्या माध्यमातून तुम्हाला 21% डिस्काउंट मिळू शकतो. त्यानुसार तुम्ही 9,999 मध्ये हा टॅबलेट घरी घेऊन जाऊ शकतात. जर तुम्ही EMI ऑफर घेऊ इच्छित असाल तर तुम्ही 485 मध्ये हा टॅबलेट घरी घेऊन जाऊ शकतात.