TATA : शेतकऱ्याच्या मुलाचा पगार 109 कोटी! एकेकाळी वडिलांसोबत शेती करायचा, आज सांभाळतोय टाटा समूहाची कमान

टाइम्स मराठी टीम : TATA समूहाला भारतात एक वेगळंच स्थान आहे. टाटा म्हटलं कि प्रत्येक भारतीयाची छाती ताठ होते. रतन टाटा यांच्या टाटा समूहाने देशात आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. टाटा समूहाच्या या यशात टाटांसाठी काम करणाऱ्या लोकांचाही मोठा वाटा आहे. आज आम्ही तुम्हाला टाटांच्या अशा एका कर्मचाऱ्यांबाबत सांगणार आहोत ज्याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून येऊन आज मोठे नाव कमावले आहे.

   

टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांचे नाव व्यवसाय क्षेत्रात अदबीने घेतले जाते. विशेष बाब म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चंद्रशेखरन यांनी इंटर्न म्हणून टाटांच्या कंपनीत कामाला सुरवात केली. यानंतर आपल्या कष्टाने त्यांनी प्रगती करत करत आज ते TATA समूहाचे प्रमुख बनले आहेत. एका शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या चंद्रशेखरन यांना तब्बल १०९ कोटी रुपये इतका पगार आहे.

तामिळनाडूतील मोहनूर गावचे असलेले एन चंद्रशेखरन यांचे वडील शेतीचे काम करायचे. त्यांचे शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले. शिक्षणादरम्यान त्यांचा कल संगणकशास्त्राकडे जास्त होता. प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. एन चंद्रशेखरन यांनी प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, तिरुचिरापल्ली येथून अप्लाइड सायन्सेसमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संगणक अनुप्रयोग (एमसीए) केले. विशेष म्हणजे अभ्यासासोबतच ते वडिलांच्या शेतीच्या कामातही हातभार लावत होते.

1987 मध्ये TCS मध्ये इंटर्न म्हणून रुजू

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नटराजन चंद्रशेखरन यांनी 1987 मध्ये इंटर्न म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये प्रवेश केला. जवळजवळ 20 वर्षे सेवा केल्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये त्यांना TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याच वेळी, ऑक्टोबर 2009 मध्ये, एन चंद्रशेखरन वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी TCS चे CEO बनले.

आता पगार मिळतोय कोटीत

2019 मध्ये TATA सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचा वार्षिक पगार 65 कोटी रुपये होता. 2021-2022 मध्ये त्यांना 109 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. 2020 मध्ये, एन चंद्रशेखरन यांनी मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट घेतला, ज्याची किंमत 98 कोटी रुपये आहे. रतन टाटा यांचे सर्वात विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे एन चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ 2022 मध्ये 5 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.