iPhone निर्मितीसाठी Tata Group चे एक पाऊल पुढे; लवकरच या फॅक्टरीचा ताबा घेणार

टाइम्स मराठी । आजकालच्या तरुण पिढीला आकर्षक करणारा आयफोन हा मोबाईल आता लवकरच भारतात बनवला जाणार आहे. भारतामध्ये आता अँपलची सप्लायर फॅक्टरी ताब्यात घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणी नसून टाटा ग्रुप आहे. ज्यामुळे आता आपल्या भारतात आयफोन तयार होऊ शकतो. म्हणजेच टाटा भारतातील पहिली कंपनी असेल जी आयफोन बनवणार आहे.

   

ब्ल्यूमबर्ग च्या रिपोर्टनुसार टाटा समूह कर्नाटक राज्यातील विस्ट्रॉंन फॅक्टरी ची मालकी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. विस्ट्रॉंन फॅक्टरी ही इलेक्ट्रॉनिक सामान बनवण्याचा व्यवसाय करते. विस्ट्रॉंन फॅक्टरी ची किंमत 600 मिलीयन डॉलर्स पेक्षा जास्त असून या फॅक्टरी मध्ये सध्या iphone 14 बनवण्यात येत आहे. या फॅक्टरी ने 2024 पर्यंत 1.8$ बिलियन डॉलर आयफोन बनवून पाठवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. विस्ट्रॉंन फॅक्टरी मध्ये सध्या 10000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. त्याचबरोबर पुढच्या वर्षी कर्मचाऱ्यांची संख्या तीन पटीने वाढवण्यात येणार आहे. विस्ट्रॉंन फॅक्टरी ही तैवान येथील कंपनी असून आता या फॅक्टरी ला भारतातील आयफोन बनवण्याच्या बिजनेस मधून बाहेर पडायचे आहे. यानंतर टाटा ने ही कंपनी खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एप्पल च्या बिजनेस मधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून ही कंपनी आता दुसरा व्यवसाय करणार आहे. जेणेकरून ही कंपनी आयफोन व्यतिरिक्त दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बिजनेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर टाटा ग्रुप ही कंपनी ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे भारतातील विस्ट्रॉन चे उत्पादन कार्य संपुष्टात येईल. एप्पल कंपनी प्रोडक्ट मध्ये वेगवेगळे फीचर्स आणण्याचा विचार करत असून ही कंपनी चीनच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण कोरोना महामारी च्या काळात या कंपनीच्या उत्पादनावर प्रचंड प्रभाव झाला होता. त्यामुळे भारत आणि व्हिएतनाम या दोन देशात ही कंपनी उभारण्याचा प्रयत्न करू शकतात.