Tata Motors ची ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर; ‘या’ 4 कारवर मिळवा बंपर Discount

टाइम्स मराठी । टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी या महिन्यात काही स्पेशल ऑफर सुरू केल्या आहेत. या ऑफरमुळे ग्राहकांना टाटाच्या ५ कार खरेदी करताना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळू शकतो. या डिस्काउंट सोबतच वेगवेगळ्या ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. यामध्ये एक्सचेंज ऑफर, कॅशबॅकसह डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. चला आज आपण जाणून घेऊया टाटाच्या कोणत्या गाडीवर नेमका किती रुपयांचा डिस्कॉऊंट आहे त्याबाबत…

   

१) Tata Motors Harrier-

टाटा मोटर्स च्या एसयूव्ही हॅरियर आणि सफारी या दोन्ही कार खरेदी करणाऱ्यांना या महिन्यात 35,000 रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर या कार सोबत 25,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट आणि 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे.

२) Tata Tiago-

टाटा मोटर्सची स्पेशल कार मॉडेल असलेली टाटा टियागोच्या पेट्रोल आणि सीएनजी कार वर देखील सूट देण्यात आली आहे. टाटा टियागोच्या पेट्रोल गाडीवर 30,000 रुपये पर्यंत सूट देण्यात आलेली असून 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. जर तुम्ही टाटा टियागो ची सीएनजी कार घेऊन इच्छित असाल तर तुम्हाला त्यावर 43,000 रुपये कमीत कमी सूट मिळू शकते.

३) Tata Tigor-

टाटा टिगोर या कारच्या दोन्ही व्हेरिएंट मध्ये म्हणजेच पेट्रोल आणि सीएनजी वेरियंटमध्ये ग्राहकांना सूट देण्यात येणार आहे. टाटा टिगोर पेट्रोलियम कारवर तुम्ही 33,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. आणि टाटा टिगोरच्या सीएनजी वेरियंट वर 48,000 रुपये पर्यंत सूट मिळेल.

४) Tata Motors Alto Car-

टाटा मोटर्सच्या अल्टो कारच्या पेट्रोल वेरिएंट वर तुम्हाला 23000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच 10000 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या सोबतच 10000 रुपयांमध्ये तुम्ही एक चेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळवू शकतात. तर दुसरीकडे अल्टोच्या डिझेल वेरियंट वर तुम्हाला 28000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. त्यानंतर 20000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील या ऑफर मध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अल्टो डिझेल कार वर 10000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देखील देण्यात येणार आहे.