Tata Motors ने लॉन्च केले 3 नवीन कमर्शियल पिकअप; देतात अप्रतिम पॉवर

टाइम्स मराठी । देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत तीन नवीन कमर्शियल वाहन लॉन्च केले आहे. हे लॉन्च करण्यात आलेले वाहन देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन डेव्हलप करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. या वाहनांचे नाव  Intra V70, Intra V20 Gold, Ace HT + आहे. या वाहनांचा उपयोग वेगवेगळ्या कमर्शियल कामासाठी केला जाऊ शकतो.

   

 हे तिन्ही कमर्शियल वाहन  शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांसाठी डेव्हलप करण्यात आले आहे. यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले असून  या वाहनांचा उपयोग ट्रान्सपोर्टेशन साठी करता येऊ शकतो. याशिवाय कंपनीने पॉप्युलर कमर्शियल व्हीकल INTRA V50 आणि ACE DIESEL चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. सध्या या पिकअपची बुकिंग सुरू करण्यात आली असून तुम्ही या वाहनांची बुकिंग टाटा मोटर्स सीवी डीलरशिपच्या माध्यमातून करू शकतात.

TATA Intra V70 इंजिन 

TATA Intra V70 या पिकअप मध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 220 NM मॅक्झिमम टॉर्क जनरेट करते. या मॉडेलच्या माध्यमातून 9.7  फूट लांब सामानाची वाहतूक करता येऊ शकते. हे पीकअप 1700 किलो पर्यंत वजन उठवण्यास सक्षम आहे. टाटा मोटर्स ने या पिकअप चे केबिन कार प्रमाणे डेव्हलप केले आहे. या पिकअप मॉडेल मध्ये कंपनीने पेलोड कॅपॅसिटी देण्याचा वादा केला आहे. या पिकअप मध्ये कस्टमरला जास्त लोडिंग एरिया, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि पॉवरफुल ड्राईव्ह ट्रेन मिळते. 

TATA Intra V20 Gold पहिले बाय फ्युअल पिकअप

TATA Intra V20 Gold हे भारतातील पहिले बाय फ्युअल पिकअप आहे. या पिकअप मध्ये ग्राहकांना CNG सपोर्ट देखील मिळेल. कंपनीने या पिकअप मध्ये तीन CNG टॅंक उपलब्ध केले असून हे कम्यूट करण्यास सोपे आहे. हे पिकअप 1200 किलो वजन उठवण्यास सक्षम आहे. या पिकअप ची मॅक्झिमम रेंज 800 किलोमीटर एवढी आहे.

TATA ACE HT + इंजिन 

TATA ACE HT + या पिकअप मध्ये 800 cc डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 35 BHP पावर आणि 85 nm मॅक्झिमम टॉर्क जनरेट करते. या पिकअप मध्ये देण्यात आलेले इंजिन हे टर्बो चार्ज डिझेल इंजिन असून 900 किलो वजन उठवण्यास सक्षम आहे.