Tata Motors लवकरच लाँच करणार ‘या’ 3 SUV Cars; पहा काय फीचर्स मिळतील

टाइम्स मराठी । टाटा मोटर्स (Tata Motors) ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षांपासून टाटा आपल्या ग्राहकांसाठी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या लाँच करत असते. नुकतच टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक Nexon EV भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली होती. आता लवकरच टाटा मोटर्स कर्व्ह मॉडेल देखील मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. यामध्ये अपडेटेड हॅरियर, सफारी, पंच इलेक्ट्रिकआणि कर्व इलेक्ट्रिक या SUV चा समावेश आहे. यापैकी टाटा कर्व इलेक्ट्रिक2024 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते आणि अपडेट टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्ही SUV याच वर्षाच्या शेवटी लॉंच करण्यात येणार आहेत.

   

टाटा पंच इव्ही (Tata Panch EV)

Tata Panch या अपकमिंग Electric SUV ची सध्या फायनल टेस्टिंग सुरू आहे. टाटा पंच इलेक्ट्रिकमध्ये 10.2 किंवा 12.3 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक सनरुफ दोन स्पोक स्टिअरिंग व्हील, 360 डिग्री कॅमेरा या अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही मध्ये देण्यात येऊ शकतात. यासोबतच या एसयूव्हीच्या डिझाईन मध्ये सेंट्रल कन्सोल देखील मिळू शकते. कंपनी Tata Panch EV मध्ये 74 bhp इलेक्ट्रिक मोटर देणार आहे. टाटा मोटर्स कडून या गाडीमध्ये 24 kwh बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 300 km पर्यंत रेंज ऑफर करते.

टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट (Tata Harrier and Safari Facelift)

टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट या दोन्ही SUV मध्ये हॉरिझोंटलट, अपडेटेड बंपर, अपडेटेड अलॉय व्हील, स्लिमर, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, यासोबतच नवीन ग्रील्स उपलब्ध करण्यात येणार आहे. या अपडेटेड मॉडेल मध्ये कर्व सह कॉस्मेटिक बदल करण्यात येणार आहे. यासोबतच दोन्ही SUV मध्ये नवीन डिझाईन मध्ये डॅशबोर्ड, 10.25 इंचाचा स्क्रीन इम्पोर्टेनमेंट सिस्टीम, नवीन टू स्पोक स्टिअरिंग व्हील देण्यात येणार आहे. टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट या दोन्ही अपडेटेड एसयूव्ही मध्ये 2.0 लिटर टर्बो डिझेल इंजन देण्यात येणार आहे. हे इंजन 170 bhp पावर आणि 350 nm पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर दोन्ही अपडेटेड SUV सोबत 1.5 लिटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकते.