Tata लवकरच लाँच करणार Nano चे Electric व्हर्जन; किंमतही असणार कमी

टाइम्स मराठी । रतन टाटा यांची ड्रीम कार लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ शकते. यापूर्वी टाटा कंपनीची ही नॅनो (Tata Nano) लोकांना खूप आवडली होती. आणि ही परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक जण कार घेण्याचं स्वप्न या नॅनो कार च्या माध्यमातून पूर्ण करत होतं. परंतु हळूहळू या नॅनो कारची फॅन्टेसी कमी होत गेली आणि टाटाने या कारचे प्रोडक्शन बंद केले. ही कार टाटा ने फक्त एक लाख रुपयांमध्ये विकली होती.आता लवकरच टाटा कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट (Tata Nano EV) मध्ये ही टाटा नॅनो कार लॉन्च करणार आहे.

   

इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी दिवसेंदिवस वाढत असून इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. यामध्ये टाटा लॉन्च करत असलेली इलेक्ट्रिक नॅनो कार टिकू शकेल का हा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे टाटा ही कार परवडणाऱ्या किमतीत लॉन्च करणार आहे. याबद्दल अजून काहीच अधिकारीक सूचना आलेल्या नसून मीडिया हाऊसच्या माध्यमातून ऑटो एक्सपर्टकडून ही बातमी मिळाली आहे.

सध्या टाटा कंपनीच्या या नॅनो इलेक्ट्रिक कारच्या प्रोटोटाईप वर काम करण्यात येत आहे. ही कार नवीन लुक मध्ये नवीन अंदाजात सादर केली णार असून 2024 च्या अखेरीस बाजारात दिसू शकते. यापूर्वी देखील टाटा कंपनीकडून इलेक्ट्रिक नॅनो कार सादर करण्यात आली होती. ही कार खूप फेमस झाली होती. टाटा नॅनो बद्दल अजून कोणती इन्फॉर्मेशन मिळाली नसून ही इलेक्ट्रिक नॅनो 300 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि त्याची किंमत 5 लाख रुपये असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टाटा कंपनीची नॅनो इलेक्ट्रिक कार जर टाटा ने कमी किमतीत उपलब्ध केली तर एलोन मास्क यांच्या टेस्लासह इतर कंपन्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. कंपनीला मोठा नुकसान होऊ शकते. लवकरच टेस्ला कंपनी ही भारतामध्ये सेटल होणार आहे. आणि टेस्लाची नवीन कार देखील लॉन्च होणार आहे. ही कार टेस्ला 20 लाख रुपयांमध्ये लॉन्च होऊ शकते. या हिशोबाने जर टाटा कंपनीने नॅनो इलेक्ट्रिक कार कमी किमतीत विकली तर टाटाला मोठा फायदा होऊ शकतो.