Tata Nexon EV Facelift लॉन्च; 465KM रेंज, किंमत किती?

Tata Nexon EV Facelift | भारतीय बाजारामध्ये टाटा मोटर्स या आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपनीने Tata Nexon EV Facelift आज लॉन्च केली आहे. टाटा नेक्सन ही देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या एसयूव्ही पैकी एक आहे. ही कार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि परिपूर्ण फीचर्सने सुसज्ज आहे. टाटा मोटर्सने स्मार्ट, स्मार्ट प्लस, प्युअर प्लस, क्रिएटिव प्लस, फियरलेस, फियरलेस प्लस व्हेरिएंट मध्ये नवीन नेक्सन लाँच केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

लूक आणि डिझाईन –

Tata Nexon EV Facelift ही कार नवीन इंटेरियर आणि एक्स्टिरियल मध्ये बऱ्याच बदलांसह लॉन्च करण्यात आली आहे. या कारला कंपनीने पूर्णपणे फ्रेश लुक दिला आहे. यामध्ये कंपनीने कॉस्मेटिक अपडेट सह मेकॅनिकल अपडेट्स देखील दिले आहेत. एवढेच नाही तर या कारची ड्रायव्हिंग रेंज, डिझाईन, लुक, हेडलाईट, टेल लाईट, ब्रेकिंग सिस्टीम हे सर्व पूर्णपणे नव्याने अपडेट करण्यात आले आहे. या कारमध्ये सिल्वर फॉक्स स्किड प्लेट देण्यात आलेली असून त्याचबरोबर नवीन हेड लॅम्प हाऊसिंग, नवीन युनिक स्लाईटेड डिझाईन, फ्रंटला एलईडी कर्व्ह मध्ये लाइटिंग देण्यात आलं आहे. हे एलईडी लाईट चार्जिंग स्टेटस देखील दाखवतात.

465KM रेंज- Tata Nexon EV Facelift

Tata Nexon EV Facelift या कारमध्ये सेकंड जनरेशन मोटर देण्यात आली आहे. ही मोटार 16000rpm पर्यंत चालण्यास सक्षम असून 142.6 bhp पावर आणि 2500 nm मॅक्झिमम पीक टॉर्क जनरेट करते. Tata Nexon च्या लाँग रेंज व्हेरियंट मध्ये 40.5 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 465 किलोमीटर पर्यंत रेंज देते. तर दुसरीकडे, मिड-रेंज वेरिएंटमध्ये 30 kWh बॅटरी देण्यात आली असून या बॅटरीच्या जोरावर तुम्ही 325 किलोमीटरपर्यंत आरामात प्रवास करू शकता. या इलेक्ट्रिक कारचे टॉप स्पीड 150 किलोमीटर प्रति तास इतकं असून अवघ्या 8.9 सेकंदामध्ये ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम आहे.

सेफ्टी फीचर –

टाटाच्या या नवीन जनरेशन एसयूव्ही मध्ये IP67 सेफ्टी देण्यात आली आहे. यासोबतच इमर्जन्सी कॉल, ब्रेक डाऊन कॉल, यासह हिल डिसेंट कंट्रोल, हिल एसेंट कंट्रोल , पॅनिक ब्रेक अलर्ट, ऑटो वाहन होल्ड , i-TPMS हे सेफ्टी फीचर देखील देण्यात आले आहे. एवढेच नाही तर Tata Nexon ev Facelift मध्ये 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, फर्स्ट कॅटेगिरी ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ESP, 6 एअर बॅग, हिल होल्ड कंट्रोल, रोल ओवर मिटीगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, ISOFIX चाइल्ड अँकर शीट, TPMS हे सेफ्टी फीचर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कम्फर्ट फीचर –

कारमध्ये देण्यात आलेल्या कम्फर्ट फीचर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये IRA 2.0 मोबाईल कनेक्टेड टेक्नॉलॉजी, व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरुफ, JBL 9 स्पीकर साऊंड सिस्टिम , वायरलेस चार्जर, वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नेव्हिगेशन डिस्प्ले हे फीचर्स उपलब्ध आहेत.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, टाटा मोटर्सच्या ह्या नेक्सन फेसलिफ्ट ईव्ही ची एक्स शोरूम किंमत 14 लाख 74 हजार पासून ते 19 लाख 94 हजार रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन 21 हजार रुपयांच्या टोकन रक्कम सह ही कार बुक करू शकता.