टाइम्स मराठी । टाटा मोटर्स कंपनीचे मॉडेल नवीन फीचर्स आणि टेक्नॉलॉजीने अपडेट करत आहे. पूर्वी टाटा कंपनी फक्त कमर्शियल आणि हेवी व्हेईकल कार्स बनवत होती. परंतु आता टाटा मोटर्स ने इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. आजकाल प्रत्येक ऑटोमोबाईल कंपन्या भारतीय बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपलं लक आजमावत आहेत. त्याचबरोबर आता टाटा मोटर्स कंपनीने टाटा नेक्सन इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन अपडेट सह लॉन्च केली आहे. ही कार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि फीचर्स परिपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
डिझाईन– Tata Nexon EV
Tata Nexon EV ही कार नवीन इंटेरियर आणि एक्स्टिरियलमध्ये पूर्वीच्या मॉडेल पेक्षा शानदार दिसत आहे. या कारला कंपनीने पूर्णपणे फ्रेश लुक दिला आहे. यामध्ये कंपनीने कॉस्मेटिक अपडेट सह मेकॅनिकल अपडेट्स देखील दिले आहेत. एवढेच नाही तर या कारची ड्रायव्हिंग रेंज, डिझाईन, लुक, हेडलाईट, टेल लाईट, ब्रेकिंग सिस्टीम हे सर्व पूर्णपणे नव्याने अपडेट करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवीन हेड लॅम्प हाऊसिंग, नवीन युनिक स्लाईटेड डिझाईन, फ्रंटला एलईडी लाइटिंग कव्ह मध्ये देण्यात आली आहे. हे एलईडी लाईट चार्जिंग स्टेटस देखील दाखवतात.
यासोबतच कंपनीने स्प्लिट हेडलैंव, सिक्केंशियल एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स, ग्रील सह लोवर बंपर, चारही साईडने प्लास्टिक वापरण्यात आले आहे. या कारमध्ये सिल्वर फॉक्स स्किड प्लेट देण्यात आलेली असून पेट्रोल मॉडेल वर एलईडी टेल लॅम्प देखील देण्यात आला आहे. या कारच्या ड्युअल टोन पेंट स्कीमसह या कारच्या सर्वात वरच्या हिस्स्यामध्ये ब्लॅक शेड देण्यात आले आहे. यासोबतच ICE या वर्जन मध्ये वरच्या पोर्शनला बॉडी कलर देण्यात आला आहे. या कारचा रुफ माउंटेन स्पोईलर आणि मागच्या साईडने ev बेजिंग देण्यात आली आहे.
स्पेसिफिकेशन
Tata Nexon EV या कारमध्ये सेकंड जनरेशन मोटर देण्यात आली आहे. ही कार पूर्वीच्या कारच्या तुलनेत 12000 rpm ने वाढून 16000rpm पर्यंत चालण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर 142.6 bhp पावर आणि 2500 nm मॅक्झिमम पीक टॉर्क जनरेट करते. टाटाच्या या इलेक्ट्रिक कारची टॉप स्पीड 150 किलोमीटर प्रति तास एवढी असून ही कार 8.9 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम आहे. यामध्ये रीजनरेटिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून चार्जिंग साठी मल्टी मोड रिजन देण्यात आले आहे. जेणेकरून मोटरला नवीन गिअर नॉब आणि पेडल शिफ्टर यासह ट्यून करण्यात आले आहे. या नवीन मॉडेल कारला इको सिटी आणि स्पोर्ट हे तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे.
बॅटरी
Tata Nexon EV नवीन जनरेशन ची ही SUV ला मीड रेंज आणि लॉन्ग रेंजमध्ये रिबेज करण्यात आले आहे. त्याचबरोबर या देण्यात आलेल्या मोटरला पावर देण्यासाठी न्यू रेंजमध्ये ३० किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही SUV फुल चार्ज झाल्यावर 325 किलोमीटर एवढी रेंज देते. लॉन्ग रेंज वेरियंटमध्ये 40.5 किलो वॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज झाल्यावर 465 किलोमीटर पर्यंत रेंज देते. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 7.2 kwh चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फास्ट चार्ज ने चार्ज केल्याने 56 मिनिटांमध्ये ही बॅटरी 80 टक्के चार्ज होते.
सेफ्टी फीचर
या नवीन जनरेशन एसयूव्ही मध्ये IP67 सेफ्टी देण्यात आली आहे. यासोबतच इमर्जन्सी कॉल, ब्रेक डाऊन कॉल, यासह हिल डिसेंट कंट्रोल, हिल एसेंट कंट्रोल , पॅनिक ब्रेक अलर्ट, ऑटो वाहन होल्ड , i-TPMS हे सेफ्टी फीचर देखील देण्यात आले आहे. एवढेच नाही तर 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, फर्स्ट कॅटेगिरी ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ESP, 6 एअर बॅग, हिल होल्ड कंट्रोल, रोल ओवर मिटीगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, ISOFIX चाइल्ड अँकर शीट, TPMS हे सेफ्टी फीचर देखील कार सोबत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
स्पेशल
खास म्हणजे या मॉडेलमध्ये V2L आणि V2V म्हणजे व्हीकल टू वेहिकल चार्जिंग ऑप्शन देखील देण्यात आले आहे. याचाच अर्थ जर तुमच्या कारची बॅटरी संपली की तुम्हाला चार्जिंग स्टेशन शोधायची गरज नाही. तुम्ही तुमची कार वेहिकल टू वेहिकल चार्ज करू शकतात. म्हणजेच एखाद्या इलेक्ट्रिक वाहनाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची कार चार्ज करता येईल.
कम्फर्ट फीचर कारमध्ये देण्यात आलेल्या कम्फर्ट फीचर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये IRA 2.0 मोबाईल कनेक्टेड टेक्नॉलॉजी, व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरुफ, JBL 9 स्पीकर साऊंड सिस्टिम , वायरलेस चार्जर, वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नेव्हिगेशन डिस्प्ले हे फीचर्स उपलब्ध आहेत.
भारतात सर्वात जास्त विकली जाणाऱ्या टाटा नेक्सनची बुकिंग 9 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. आणि ही कार 14 सप्टेंबर ला लॉन्च करण्यात येणार आहे. 21 हजार रुपयांचे टोकन मनी देऊन ऑफिशियल वेबसाईटवरून मी कार तुम्ही बुक करू शकतात. हे मॉडेल क्रिएटिव्ह, फियरलेस आणि इमपावर्ड ट्रीम ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अजून तरी या नवीन मॉडेलच्या किमती उघड झाल्या नसून टाटा नेक्सन इव्हीची किंमत 14.50 लाख रुपये होती. त्यानुसार या नव्या मॉडेलच्या किमती आणखी वाढवण्यात येऊ शकतात.